पोलीसांच्या स्वास्थ निरोगी जीवन शैलीवर पोषण आहाराबाबत पोलीस मुख्यालय गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात माहिती अशी की,आजच्या धकाधकीच्या युगात पोलीस विभागात पोलीस अधिकारी/अंमलदार हे दिवस रात्रपणे पोलीस म्हणून आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना विविध प्रकारचे आजार- विकार जडले जातात. आपली व आपले कुटुंबाचे जीवनशैली ही कश्याप्रकारे निरोगी ठेवावी, या संकल्पनेतुन पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे , यांचे मार्गदर्शनाखाली पोषण आहाराबाबत  दिनांक १४/०७/२०२३ रोजी "प्रेरणा सभागृह”, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे ऑनलाईन द्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यशाळेत मुंबई येथील प्रमुख मार्गदर्शक श्रीमती अंजना गौर व श्रीमती कल्पना बनकर यांच्या गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी/ अंमलदार यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले.

        सदर कार्यशाळेत श्रीमती अंजना गौर, यांनी आपल्या रोजच्या धावपळी च्या जीवनात आपण इतके व्यस्त होवुन जात असतो की आपले आरोग्याकडे अजिबात लक्ष राहत नसते. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व महत्वाची पोषणत्तवे प्राप्त होत नसतात. आपण ज्या अन्नाचे तसेच आहाराचे सेवन करत असतो त्यात काही आपल्या शरीराला आवश्यक अशी पोषकतत्वे देखील समाविष्ट असतात, ज्याने आपल्या शरीराचे भरण पोषण होत असते. जीवनसत्व हा आपल्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक असतो. ज्याची आवश्यकता आपल्या प्रत्येकाला असते. जीवनसत्वे शरीराला प्राप्त व्हावी यासाठी आपण व्हिटॅमिनयुक्त आहाराचे सेवन करुन प्राप्त करु शकतो. कारण व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपल्याला विविध शारिरीक आजार देखील जडु शकतात. आणि आपले शारिरीक स्वास्थ देखील चांगले राहत नसते तसेच शरीराची वाढ देखील व्यवस्थित होत नसते. म्हणुन आपल्या आहारात व्हिटॅमिनचा समावेश हा करायलाच हवा असे सांगितले.

          श्रीमती कल्पना बनकर यांनी शरीर निरोगी राहण्याकरिता योग्य आहार, स्वस्थ जीवनशैली आणि मनाची अवस्था या गोष्टी आवश्यक असुन निरोगी स्वास्थ्यासाठी आहाराची महत्वाची भुमिका आहे. आपली व आपले कुटुंबाचे जीवन शैली ही कशी निरोगी ठेवावी याबाबत त्यांनी थोडक्यात मार्गदर्शन दिले. सदर कार्यशाळेत पोनि श्रीमती नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे यांच्यासह जवळपास एकुण ८३ च्या संख्येने पोलीस अधिकारी / अंमलदार उपस्थित होते.

        सदर प्रशिक्षणाचे सुत्र संचलन पोहवा राज वैद्य व आभार प्रदर्शन पोनि श्रीमती. नंदिनी चानपुरकर यांनी केले. तर सदर कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोनि श्रीमती नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे, सफौ रोशन उईके, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा प्रभाकर पालांदुरकर, राज वैद्य, पोकॉ रोशन येरणे यांनी सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट