मरारटोली बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेसह एका विधी संघर्ष बालिका व ईतर दोघे अश्या चौघांना स्था.गु.शा. गोंदिया पथकाने केले जेरबंद….

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :-गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच ईतर गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल असा एकूण किमती 20 लाख 09 हजार 400/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे…
जिल्ह्यातील ईतर ही चोऱ्यांचा उलगडा करण्यात स्था.गु.शा. व रामनगर पोलीस पथकास मोठे यश..
▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना ता. 18-05-2 024 चे 16.25 ते 16.45 वाजता दरम्यान महिला फिर्यादी नामे सौ.अरुणा गौरव येडे रा. कलपाथरी पो. पाथरगाव ता.लांजी जिल्हा – बालाघाट ही मरारटोली बस स्टॉप वर तिचे मुलासह गोंदिया ते भंडारा जाणा-या एसटी बस मध्ये चढत असताना तिचे पर्स मध्ये असलेले सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, एक सोन्याची अंगठी, सोन्याचे कानातील झुमके, चांदीचे पैजन व नगदी 25,000/- रू असा एकुण 2 लाख 43 हजार रु.चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरून पो. ठाणे रामनगर येथे अपराध क्र. 133/ 2024 कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले होते..


सदर घटनेची माहिती मिळताच मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. दिनेश लबडे, स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळास भेट देवून गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ परीसराची सी. सी. टी.व्ही. फुटेज द्वारे पाहणी करीत असता, प्राप्त फूटेज मध्ये फिर्यादी च्या आसपास दोन संशयास्पद महिला फिर्यादीच्या मागावर असल्याचे तसेच महिला फिर्यादी ज्या बसमध्ये चढत होत्या त्यांच्यासोबत राहून गर्दीचा फायदा घेवून संशयास्पदरित्या फिर्यादी जवळून पळून जातांना दिसून आल्याने……..सदर महिलांच्या बाबत गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती प्राप्त करून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक 21/05/2024 रोजी संशयित महिला नामे- 1) सिमरण आशिष बिसेन, वय 24 वर्ष रा. शिवाजी वार्ड, कुडवा, गोंदिया व एक 2) विधीसंघर्ष बालिका वय 15 वर्ष,
यांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात आले…दोघींनाही बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनेबाबत विश्वासात घेवून विचारपूस चौकशी केली असता महीला आरोपी व विधी संघर्ष बालिका या दोघींनी ही नमूद चोरी केल्याचे सांगून कबूल केले आहे…..त्यांचेकडून पो.स्टे. रामनगर गुन्ह्यातील दागिने एकूण किमती 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे…..
त्याचप्रमाणे सदर महिला आरोपी व वि. स. बालीका यांना चोरी संबंधात सखोल विचारपुस चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मुद्देमाला व्यतिरिक्त आणखी चोरीचे ईतर गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्यांचे ताब्यातून त्यांचे राहते घरझडतीमध्ये एकुण किंमती 17 लाख 81 हजार 400/- रुपयांचा मुद्देमाल (पिवळसर व चांदी सारखे धातूचे दागिने मिळुन आल्याने हस्तगत करण्यात आले…..सदरच्या मुद्देमाला बाबत त्यांना सखोल विचारणा केली असता, त्यांनी काही मुद्देमाल एक महिन्यापूर्वी सालेकसा बस स्टॅन्ड परीसरातून एका महिलेच्या पर्स मधून चोरल्याचे तसेच उर्वरीत मुद्देमाल हा आरोपी नामे- 1) सुरज पप्पु बिसेन, वय 20 वर्षे, 2) आशिष पप्पु बिसेन, वय 28 वर्षे, दोन्ही रा. शिवाजी वार्ड, कुडवा, गोंदिया यांनी गोंदिया, रामनगर परीसरातून चोरी केल्याचे सांगितले…… असा एकुण 20 लाख 09 हजार 400/- रु. चा संपुर्ण मुद्देमाल गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आलेला आहे….
यातील महिला आरोपी- 1) सिमरण बिसेन,व 2) विधि संघर्ष बालीका या दोघींनी 1) पोलीस स्टेशन रामनगर अप.क्र. 133/24 कलम 379 भादवि, तसेच 2) पो. स्टे सालेकसा अंतर्गत बसस्टॅन्ड वरील चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे….तसेच यातील
आरोपी नामे-
3)सुरज पप्पु बिसेन, वय 20 वर्षे,
4) आशिष पप्पु बिसेन, वय 28 वर्षे, दोन्ही रा. शिवाजी वार्ड, कुडवा, गोंदिया
यांनी गोंदिया, रामनगर परीसरातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील चोऱ्यांच्या उलगडा करण्यात पोलीस पथकास मोठे यश मिळाले आहे…
ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांनाही गुन्ह्याच्या पुढील तपास कायदेशीर प्रक्रिया कारवाई संबंधाने रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे…..यातील महीला आरोपी व विधी संघर्ष बालिका, आणि पुरुष आरोपीतांनी मिळुन जिल्ह्यात ईतर आणखी चोऱ्या केल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही…..या बाबत सखोल तपास रामनगर पोलीस करीत आहेत..
सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक पोउपनि..महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पो.अंमलदार पोहवा दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, प्रकाश गायधने, सुजित हलमारे, पोशि संतोष केदार, चापोशि कुंभलवार यांनी केलेली आहे………तसेच पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, यांचे नेतृत्वातील पो. ठाणे पोलीस पथकाने सुध्दा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह नमूद गुन्ह्याचा उलगडा , आरोपीतांना जेरबंद करण्याकरीता संयुक्तरित्या परिश्रम, मेहनत घेवुन कामगिरी केली आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com