मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानेअभिलेखा वरील सराईत आरोपीस अटक करून आयुक्तालयातील सोनसाखळी चोरीचे एकूण ५ गुन्हे केले उघड..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :– मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अंमलदार याना अभिलेखा वरील गुन्हेगार अनिरथ उर्फ अनिरुद्ध योगेश नानावत वय 22 वर्षे रा.कुसेगाव, ता. दौड जि. पुणे याचा पिंपरी पोलीस ठाणे गुरक्र 716/24 कलम 309 (6),3(5)BNS या चैन स्नेचींग चे गुन्ह्यात सहभाग असल्याचे खात्री लायक बातमी मिळाल्याने सदर गुन्हा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडे तपासावर घेवून नमूद आरोपीस ताब्यात घेवून सदर गुन्ह्यात दि 4/8/रोजी अटक केले.



नमूद गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपीकडे करण्यात आलेल्या तपासाअंति आरोपीताने पिंपरी-१ ,चिखली-२ ,निगडी-२,चिंचवड -१ असे चैन सनेचींग चोरीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले.

तपासात सदर आरोपी कडून अद्याप पर्यंत 40 ग्रॅम वजनाचे रुपये 2, 80 ,000/- इतक्या किमतीचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल रू किंमत 1,50,000 असे एकूण 4,30,000 रू चां मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत-

1) पिंपरी पोस्टे गुन्हा रजि. नंबर 716/2024 भ.न.एस..कलम- 309(6),3(5) प्रमाणे

2) निगडी पोस्टे गुन्हा रजि. नंबर 346/2024 भ.न.एस..कलम- 309(4).

3) चिंचवड पोस्टे गुन्हा रजि. नंबर 314/2024 भ.न.एस..कलम- 309(4).प्रमाणे

4) चिखली पोस्टे गुन्हा रजि. नंबर 442/2024 भ.न.एस..कलम- 309(4). 3(5).

5) चिखली पोस्टे गुन्हा रजि. नंबर 477/2024 भा.न.एस.कलम- 309(4).3(5) प्रमाणे

सदरची कामगिरी तपासी अधिकारी सपोनी अभिनय पवार यांच्यासह सफौ. खांडे, रोंगे ,पोह. विक्रांत गायकवाड , गणेश हिंगे, राहुल खारगे, नितीन लोखंडे , आशिष बनकर ,विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे, नितीन उमरजकर, प्रशांत पाटील, पो.ना.गणेश कोकणे ,चंद्रकांत गडदे, पो. शि.बाबाराजे मुंडे व अमर कदम अशा पथकाने पार पाडली आहे

आरोपीचा पुर्वइतिहास –
1) पालघर पोलीस स्टेशन 151/2022 भादवि कलम 395, 397,सह मपोआ कलम 37,(1)(३) सह 135 .

2) लोणी काळभोर पोलीस स्टेशन 255/2024 भादवि कलम 454,457,380.

3) लोणी काळभोर पोलीस स्टेशन 275/2024 भादवि कलम 457, 380.

4) लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे 388/2024 भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 331(3),(2),(4),305.

अशी माहिती श्री विजय ढमाळ.

पोलीस निरीक्षक मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पुणे यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट