पालघर पोलीस दलाचे ताफ्यात नवीन चारचाकी व दुचाकी असे एकूण १७ वाहनांचा समावेश

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर :-पालघर पोलीस दलास दैनंदिन कामकाजाकरीता व कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याकरीता मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडून व जिल्हा नियोजन व विकास समितीकडून एकूण १७ वाहने मिळालेली आहेत.
त्यापैकी १ महिंद्रा एक्स्युची-७००, ४ महिंद्रा स्कॉर्पिओ, ४ मारुती ईको अशी एकूण ९ वाहने हे जिल्हा नियोजन व विकास समितीकडून प्राप्त निधीतुन मिळालेली असून ३ टाटा बस व ५ बजाज पल्सर (दुचाकी) अशी एकूण ८ वाहने हे मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचेकडून मिळालेली आहेत.




सदर वाहनांचे उद्घाटन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर यांचे हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर येथे संपन्न झाले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com