बोरीवलीत लाकडी पोटमाळा तुटून पडल्याने एक महिन्याच्या बालकाचा जागीच मृत्यू…

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली:एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे अपमृत्यु नोंद क्र 69/2023 कलम 174 CRPC दिनांक 28/06/2023 रोजी नोंद करण्यात आला असून त्याची हकीकत खालील प्रमाणे.

मयत मुलगा नामे कु.आर्यन रवींद्र पाल, वय- 01 महिना 24 दिवस, राठी- गल्ली नंबर 13, नवीन बाथरूमच्या मागे, गणपत पाटील नगर, बोरीवली प, मुंबई यास घेऊन इतर दोन व्यक्ती राहते घरात बनवलेल्या लाकडी पोटमाळ्यावर झोपलेले असताना, पोटमाळ्याच्या खालील खांब तुटल्याने पोटमाळ्याचा अर्धा भाग जमिनीवर कोसळला. तेंव्हा पोटमाळ्यावर झोपलेले तिघेही फरशीवर पडले. सदर घटनेमध्ये मयत बालकाच्या डोक्यास मार लागल्याने तो बेशुद्ध झाला व इतर दोघांना मुका मार लागला. सदर मयत मुलगा बेशुद्ध झाल्याने त्यास उपचारकामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली प, मुंबई येथे दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यास तपासून दाखल पूर्व मयत घोषित केले आहे.
सदरबाबत अपमृत्यु नोंद करून मयताच्या मरणोत्तर पंचनामा करण्यात आला आहे. तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयताची आई, मावशी, व पोटमाळ्यावर झोपलेला इसमाचे सविस्तर जबाब नोंद केले आहे. त्यांनी जबाबात सांगितले की पोटमाळा तुटून खाली जमिनीवर पडल्याने, मयताच्या डोक्याला दुखापत झाली व त्यात त्याचा मृत्यू झाला असावा. सदरबाबत संशय तक्रार नसल्याचे सांगितले.
तसेच नमूद घटनेच्या घटनास्थळाचा सविस्तर घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. पंचनाम्या दरम्यान घरातील पोटमाळ्याचा अर्धा भाग जमिनीवर पडलेला दिसून आला आहे.
मयताचा मृतदेह शवविच्छेदन कामी बोरिवली शवविच्छेदन केंद्र, बोरीवली प, मुंबई येथे पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवली आहे. सदर बाबत अधिक चौकशी करत आहोत.अशी माहिती श्री. सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी.कॉ.पो.ठाणे,मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com