युनिवर्सल ह्युमन राईट कौन्सिल भारत आणि आरंभ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त मेडिकल कँप संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स भारत कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री तरुणजी बाकोलीया राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती सुमन जी मोरया यांच्या मार्गदर्शनानुसार आणि महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णाताई कदम यांच्या उपस्थितीत तसेेच आरंभ सोशल फाउंडेशन च्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्ताने मेडिकल कॅम्प सलग २ दिवस बालाजी हॉस्पिटलच्या माध्यमातून घेण्यात आले.
या मेडिकल कॅम्प मध्ये जवळजवळ 100 ते 110 महिलांनी सहभाग घेतला. सर्व महिलांचे मोफत चेकअप केले गेले. यामध्ये महिलांचे बीपी, शुगर, महिलांचे इतर आजार ,सर्दी, खोकला, ताप या सर्व आजारांवर चेकअप करून त्यांना मोफत औषध सुद्धा वाटप करण्यात आले.



त्याबद्दल समस्त महिलांनी युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारतचे आणि आरंभ सोशल फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com