२५ लाखांच्या दागिन्यांसह अन्य साहित्य चोरणारा आणि १२ घरफोडींचे गुन्हे करणारा भाग्यनगर पोलिसांच्या ताब्यात -पो.अ. श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

नांदेड :– शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा घरफोड्या करून लाखोंचा ऐवज पळविणारा चोरटा अखेर पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या पथकाने पकडला. त्याच्याकडून ३५ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने आणि आदी साहित्य असा २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दि. २५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या फरांदेनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याची मोहीम पोलीस निरीक्षक सूर्यमोहन यांनी आपल्या गुन्हे शोध पथकावर टाकली. पथकातील कर्मचारी प्रदीप गर्दनमारे यांनी अतिशय बारकाईने आपल्या सहकाऱ्यांची मदत घेत तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांनीही त्यांना मदत केली आणि भाग्यनगरचे पथक मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले.

शहराच्या फरांदेनगर येथील रवींद्र जोशी महाराज यांचे घर फोडून चोरट्यांनी सतत १५ ते २० दिवस फरांदेनगर मोरचौक, छत्रपती चौक, बजाजनगर, एकतानगर या भागात भ्रमंती केल्याचे जवळपास २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी केली, परंतु मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीत येत नव्हता. अखेर त्याला भाग्यनगर पोलीस टीमने गुन्हेगार अभिजीत उर्फ अभय देवराव राऊत (वय २५) राहणार बेलानगर, भावसार चौक, नांदेड अटक केली.

आरोपीने चौकशीत भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतील बारा घरफोडी केल्याची कबुली दिली आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील ३५ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदीचे दागिने, एक लॅपटॉप, एलसीडी टीव्ही, मोबाईल, कॅमेरा असा २५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. पोलीस अधीक्षकांनी भाग्यनगर पोलिसांचे कौतुक केले असून त्यांनी घरफोडीचे बारा गुन्हे उघड केल्याबद्दल त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यापैकी पाच हजार रुपये व्यक्तिगत प्रदीप गर्दनमारे या पोलिसाला त्यांनी जाहीर केले.या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, अमलदार दिलीप राठोड, गजानन किडे, ओमप्रकाश कवडे, हनुमंता कदम आणि सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांचासहभाग होता.
यावेळी पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नूतन सहाय्यक पोलीस अधीक्षक (नांदेड शहर उपविभाग) कीर्तीका सी. एम. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांची उपस्थिती होती.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट