एका भरधाव ट्रकने दोन बाईक, बस आणि कार अशा ६ वाहनांना जोरदार दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू..

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर :– विक्रमगड तालुक्यातील आलोंडे पाली वाडा मार्गावर भीषण अपघात झाला आहे.
भरधाव ट्रक ने सहा वाहनांना जोरदार धडक दिली असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. विक्रमगड येथील पालीवाडा मार्गावर आलोंडे नाका येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रक ने दोन बाईक, बस आणि कार अश्या सहा वाहनांना जोरात धडक दिली.


यात एक पुरुष व एक महिला अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. या अपघातामध्ये सहाही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून अपघाता नंतर भरधाव ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यामुळे या मार्गावर प्रचंड
वाहतूक कोंडी झाली होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com