कमी किमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन लोकांची फसवणुक करणारी टोळी ४ पुरूष व १ महीला याना खंडणी विरोधी पथकाकडुन जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक -रणजित मस्के

ठाणे :-देवनार पोलीस स्टेशन, बृहनमुंबई शहर यांचेकडील दाखल असलेला गुन्हा रजि. नंवर ५६४/२०२४ भादवि कलम ४२०. ३४ या गुन्हयातील आरोपीत्र हे महालक्ष्मी मंदीरासमोर, साकेत रोड, राबोडी ठाणे पश्चिम याठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक / श्री मालोजी शिदे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी
विरोधी पथकातील सपोनि/सुनिल तारमळे, पोहवा/५२३८ शिंपी, पोहवा/६२४४ भोसले, पोहवा/९५२ गुरसाळी, मपोहवा/४४६६ पावसकर, पोशि/ २६४० पाटील यांनी महालक्ष्मी मंदीरासमोर, साकेत रोड, राबोडी ठाणे पश्चिम येथे सापळा रचला असता

१) हसन मुसा शेख, वय २९ वर्षे, रा. मानकोलीनाका भिवंडी जि. ठाणे मुळ राहणार शुकुरपुर पो. ठाणे लक्ष्मीनगर, नवी दिल्ली

२) बहावली अमीरअली खान, वय २६ वर्षे रा. मानकोली भिवंडी जि. ठाणे मुळ राहणार- दासना मसुरी जि. गाजियाबाद राज्य उत्तरप्रदेश,

३) हैदर नयान शेख, वय ३२ वर्षे रा. मानकोली भिवंडीजि. ठाणे, मुळ राहणार मु काटपाडा ता. जि. उत्तर चौविस परगुता राज्य पश्चिम बंगाल

४) माजीदअली ताहीर हुसेन, वय ३९ वर्षे, रा. मानकोली गाव, ता. भिवंडी मुळ राहणार लौणी बेटा हाजीपुर ता. लोणी, जि. गाजीयाबाद राज्य उत्तरप्रदेश

५) फरजाना उर्फ काजली अमीरउल्ला शेख, वय ३९ वर्षे रा. मानकोली भिवंडी जि. ठाणे. मुळ राहणार गगीताकॉलनी, रानी गार्डन, घर नंबर १५. दिल्ली हे मिळुन आले. तसेच त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन गुन्हयांतील रोख रक्कम तसेब मोबाईल असा एकुण १.८६,२००/- रू किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीत यांचेकडुन

१) देवनार पोलीस स्टेशन, मुंबई गु.र.न. ५६४/२०२४ भादवि कलम ४२०. ३४

२) मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर गु.र.न. ९५३/२०२३ भादवि कलम ४२०, ३४ हे गुन्हे उघडकीस आले असुन त्यांनी नवीमुंबई, ठाणे, मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष हुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री राजकुमार डोंगरे, शोध-२. गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वपोनि/मालोजी शिंदे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि भुषण कापडणीस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउनि/विजयकु‌मार राठोड, सपोउनि / सुभाष तावडे, सपोउनि/संजय यावर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/गणेश गुरसाळी, पोहवा/भोसले, मपोहवा/शितल पावसकर, पोहवा/निलेश जाधव, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/विनोद ढाकणे चापोना/भगवान हिवरे बोमपोशि/ज्योती शार्दुल यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट