दाऊदशी संबंध असलेल्या १५ आरोपींच्या टोळीला विविध राज्यांमध्ये ठोकल्या बेड्या.. !

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरारोड:-३२७ करोड ६९ लाख ४३ हजार ६० रुपयांचे एम.डी. जप्त करण्यात काशिमिरा गुन्हे शाखेला यश.

दाऊदशी संबंधित एमडी बनवणारा कारखाना उद्ध्वस्त करून विविध राज्यांतून १५ आरोपींना बेड्या ठाेकण्यात आल्या. ही कारवाई मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दलाच्या काशिमीरा गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ३२७ करोड ६९ लाख ४३ हजार ६० रुपयांचे एम.डी. जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय यांनी दिली.

१५ मे २०२४ रोजी गुन्हे शाखा कक्ष ०१, काशिमिरा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, दोन इसम हे त्यांच्या ताब्यातील एम.एच.-४८-डी.-११०१ या नंबरच्या राखाडी रंगाच्या गाडीमधुन ठाणे-घोडबंदर मार्गे मिरा भाईंदर परिसरात विक्री करण्यासाठी एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ घेउन येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने व्दारका हॉटेल, चेना गाव येथे में महिण्यात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने नाकाबंदी करीत असताना नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहीतीप्रमाणेची गाडी मिळून आल्याने सदर वाहनात बसलेले शोएब हनीफ मेमन (रा. वसई ), निकोलस लिओफ्रेड टायटस (रा. वसई) यांची झाडती घेता त्यांच्याकडे २ कोटींचे (बाजारभावाप्रमाणे) १००० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) मिळून आल्याने तो जप्त करून त्यांच्याविरुध्द काशीगांव पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि.नं ११०/२०२४, एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (सी), २२ (सी), २९ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासात आरोपी शोएब याने दिलेल्या माहीती वरून आरोपी दयानंद ऊर्फ दया माणिक मुद्दनार (रा. हैद्राचाद) व नासीर ऊर्फ बाबा जानेमियों शेख (हैद्राबाद राज्य-तेलंगणा) यांना १७ मे रोजी राजेंद्रनगर, सायबराबाद राज्य तेलंगणा येथे अटक करून आरोपी दयानंद ऊर्फ दया याच्या एम.डी. (मेफेड्रॉन) बनविणाऱ्या नरसापूर, मंडळ मारपल्ली (जिल्हा विकाराबाद, राज्य तेलंगणा) येथील कारखान्यात छापा टाकुन त्यामधून २० लाख ६० हजार रुपयांचे (बाजारभावाप्रमाणे) १०३ ग्रॅम एम.डी पावडर, २५ कोटींचे २५ किलो कच्चे एम.डी (RAW MD) केमीकल व एम.डी बनविण्यासाठी लागणारे इतर साहीत्य जप्त केले आहे. तपासादरम्यान आरोपी दयानंद ऊर्फ दया याने दिलेल्या माहीतीप्रमाणे आरोपी घनश्याम रामराज सरोज (रा. जौनपुर, उत्तरप्रदेश) यास वाराणसी येथून ताब्यात घेवून अटक केली. मोहम्मद शकील मोहम्मद मोईन (रा. हैद्राचाद राज्य-तेलंगणा यास गोरेगांव, पूर्व, मुंबई) येथे स्विफ्ट कार क्रमांक एमएच/०३/ए.एम/१३२२ सह ताब्यात घेतले व त्याच्या स्विफ्ट कारमधून १४ लाख ३८ हजार रुपयांचे ७१.१० ग्रॅम एम.डी. मिळाले.

तसेच आरोपी दयानंद ऊर्फ दया याने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी भरत ऊर्फ बाबू सिध्देश्वर जाधव (रा. बार्शीद, शहापुर जि. ठाणे) यास गणेशपुरी येथुन २७ मे २०२४ रोजी ताब्यात घेवुन त्याचेकडुन तो राहत असलेल्या लाप बुद्रुक, पडघा, जि-ठाणे येथील राहते घरातुन ५३,७१०/- रुपयाचे एम.डी बनविण्यासाठी लागणारे साहीत्य, व केमिकल्स जप्त केली आहेत.
तपासादरम्यान एम.डी बनविण्यासाठी लागणारे पैसे व एम डी विकुन मिळालेले पैसे याची देवाण घेवाण पाहीजे आरोपी सलीम डोळा रा. मुंबई हा आरोपी झुल्फीकार ऊर्फ मुर्तझा मोहसीन कोठारी रा. सुरत राज्य- गुजरात याचे मार्फत करीत असल्याचे तपासात निष्पंन्न झाल्याने त्याचा शोध घेवून दि.३१/०५/२०२४ रोजी त्यास सुरत गुजरात येथुन ताब्यात घेवून त्यास सलीम डोळा याने पाठविलेले १० लाख ८४ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच काही रक्कम मुंबई येथील अंगडीया (हवाला) यांच्यामार्फत पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मुस्तफा युसुफभाई फर्निचरवाला (व्यवसाय अंगडीया) व हुसैन मुस्तफा फर्निचरवाला (दोन्ही रा. भेंडी बाजार, मुंबई) यांना ताब्यात घेऊन सलीम डोळा याने पाठविलेले ६ लाख ८० हजार २०० रुपये जप्त केले.

त्यानंतर तपासात मडियाहू जि. जौनपुर येथे पाहिजे आरोपी सलीम डोळा व अटक आरोपी दयानंद मुददनार याचे साथीदार नामे अमिर तौफीक खान रा. आजमगड, उत्तरप्रदेश व त्याचा भाडु बाबू तौफीक खान हे त्यांचे साथीदार व इतर लोकांमार्फत एम डी बनविण्याचे युनिट चालवित असल्याचे निष्ंन्न झाले वरून आरोपी बाबू तौफीक खान (रा. आजमगड, उत्तर प्रदेश) मोहम्मद नदीम मोहम्मद शफिक खान (रा. आजमगड उत्तर प्रदेश) एहमद शाह फैसल शफीक आझमी (रा. आजमगड, उत्तर प्रदेश) यांना अटक करून त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एम.डी बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा ३०० किलो वजनाचे १२ कच्चे एम.डी (RAW MD) चे ड्रम जप्त केले आहेत.
तपासादरम्यान या गुन्ह्यात सहभाग असलेल्या आमिर तौफिक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान, अलोक विरेंद्र सिंह (सर्व रा. आजमगड, उत्तर प्रदेश) यांना लखनऊ (यू.पी.) येथुन अटक अटक करण्यात आली.

सदर गुन्ह्यातील आरोपी अमिर तौफीक खान याने दिलेल्या माहीतीप्रमाणे आरोपी अभिषेक उर्फ शुभम नरेंद्रप्रताप सिंह रा. जौनपुर, उत्तरप्रदेश यास १ जुलै रोजी नालासोपारा येथुन अटक करून त्याच्याकडून ५३ हजार ३०० रुपयांये ३ पिस्टल, १ रिवॉल्व्हर व ३३ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले.
सदर गुन्ह्यात महाराष्ट्रातील ३, तेलंगणा-३, उत्तरप्रदेश-८ व गुजरात-१ असे एकुण १५ आरोपी अटक करून त्यांचेकडुन ३२७,६९,४३,०६०/- रूपये (३२७ करोड ६९ लाख ४३ हजार ६० रु किंमतीचे) एम.डी. (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ, कच्चे एम.डी (RAW MD), एम.डी बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहीत्य, ३ पिस्टल, १ रिवॉल्वर व ३३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

ही कौतुकास्पद कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मा.श्री श्रीकांत पाठक, अतिरिक्त पोलीस आयुक्त. मा.श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहा. पोलीस आयुक्त., गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि. अविराज कुराडे, स.पो.नि. प्रशांत गांगुर्डे, स.पो.नि. पुष्पराज सुर्वे, पोउपनिरी. राजु तांबे, सहा.पो.उपनिरी संदीप शिंदे, पो.हवा. संजय शिंदे, संतोष लांडगे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, सचिन हुले, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत, पो. अं. प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, सौरभ इंगळे, गौरव बारी, धिरज मॅगाणे, मसुब किरण असवले व स.फौ. संतोष चव्हाण (सायबर गुन्हे) यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गांगुर्डे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट