मायभूमी फाउंडेशन तर्फे आसवले येथे भव्य मोफत वैद्यकीय आरोग्य शिबीराचे आयोजन संपन्न…

संपादक- दिप्ती भोगल
आसवले :मायभूमी फाऊंडेशन मार्फत आरोग्य शिबीराचे आयोजन शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी सकाळी १० ते ३ वा. प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे आणि कुंबळे यांची टीम यांच्या वतीने करण्यात आले.


यावेळी ECG साठी श्रध्दा हॉस्पिटलचे डॉ. कुलकर्णी सर आणि टीम यांच्या वतीने मौजे आसवले ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे विशेष सहकार्य लाभले.


या शिबीरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिरामध्ये ECG, मधुमेह, रक्तदाब, कंबरदुखी, हातपाय दुःखी, दम्याचा आजार, रक्ततपासणी (CBC, Thairoid अशा अनेक रक्त तपासण्या) तसेच आभा कार्ड (आरोग्य ओळखपत्र) मोफत औषध गोळ्या वाटप करण्यात आले.


त्यासाठी विशेष सहकार्य डॉ नवाळे सर प्रा. आरोग्य केंद्र पंदेरी आणि टीम तसेच आसवले ग्रामस्थ व महिला मंडळ आणि तरूण पिढी यानी केले.


मुंबई ते ग्रामीण भागात रहाणाऱ्या गरजु नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मायभूमी फाऊंडेशनच्या टीम मार्फत करण्यात आले.








जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अनंत काप साहेब यानी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला ,आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com diptibhogal@surakshapolicetimes.com