चारचाकी, दुचाकी वाहने व साईट वरील साहित्याची चोरी करणारी चोरट्यांची टोळी जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा : चोरीमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा समावेश: 3,67,000/-रु. किंची वाहने व साहित्य जप्त.

सातारा शहरातुन वाहन चोरी व बांधकाम साइटवरील साहित्य चोरीस जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. वापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सो. सातारा यांनी शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मा. पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी शाहुपूरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीवर वॉच ठेवून माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे शाहुपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अभिलेखावरील आरोपीची माहिती घेत असताना त्यांना दि. 26/05/2023 रोजी गोपनिय माहिती मिळाली की, अभिलेखावरील मालमत्तेच्या गुन्हयातील सराईत चोरटा हा त्याचे साथिदारांसह चोरीच्या कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनीयमची तार विक्री करण्यासाठी करंजे येथील आंदेकर चौक परिसरात आलेला आहे. अशी माहिती मिळाल्याने शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तात्काळ करंजे परिसरात जावुन नमुद इसमाचा शोध घेत असताना अभिलेखावरील सराईत चोरटा हा एका चारचाकी वाहनात व त्याचे साथिदार हे मोटार सायकलीवर बसले असल्याचे दिसून आले. पोलीसांना पाहताच मोटार सायकलवरील त्याचे साथिदार व सराईत चोरटा पळून जावु लागले त्यावेळी पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी सराईत चोरट्यास पकडले. सदर चोरट्याकडे विचारपुस केली असता त्याने आम्ही कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमीनीअमची तार विक्री करण्यासाठी क्वालीस गाडीतून घेवून आलो आहे असे सांगितले. त्याप्रमाणे पोलीसांनी सराईत चोरटा बसला असलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनीअमची तार दिसून आली. त्यानंतर त्यास पोलीस ठाणेत आणुन त्याचेकडे सखोल विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर साथिदारांचे मदतीने म्हसवे गावचे हद्दीतून कंपाऊंडच्या जाळ्या व अल्युमिनीअमची तार चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचेकडे चारचाकी क्वालीस गाडी बाबत विचारपुस केली असता त्याने कंपाऊंडच्या जाळ्या चोरी करुन नेण्यासाठी अनंत इंग्लिश स्कुल, सातारा चे जवळून क्वालीस चोरी केली असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचेकडे त्याचे साथिदारांचे बाबत विचारपुस केली असता त्याने त्यांचे साथिदारांची नांवे सांगुन त्या सर्वांनी मिळून भोसले मळा करणे व विठोबाचा नळ परिसरातून अपमिंटच्या पार्कंगमधुन आणखी दोन शाईन मोटार सायकलींची चोरी केल्याची माहिती दिली. त्याने दिले माहिती प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याचे साथिदारांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी त्यांचेकडे चोरोच्या दोन्ही शाईन मोटार सायकली मिळुन आलेल्या आहेत.

सराईत गुन्हेगारांचे साथिदारांना ताब्यात घेतले नंतर त्यांचेकडे गुन्हे पथकाने कौशल्यपूर्वक विचारपुस केली असता त्यांनी दि.12/05/2023 रोजी झेंडाचोक, करंजे परिसरामध्ये राहणाऱ्या एका परप्रांतीय इसमाचे घरामध्ये जबरदस्तीने घुसून त्या परप्रांतिय इसमांस मारहाण करुन त्याचे घरातील पैशाची बॅग जबरीने चोरुन नेल्याची कबुली देवून त्या पैशातून पल्सर मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट खरेदी केली असल्याची माहिती दिली. त्यांनी चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट गुन्हयाचे कामी जप्त करणेत आले आहे. एकदर संशयीत आरोपीनी दिले माहितीचे आधारे पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता शाहुपूरी पोलीस ठाणेस दोन मोटार सायकल चोरीचे, एक क्वालीस चारचाकी चोरीचा एक जबरी चोरीचा तसेच सातारा तालुका पोलीस ठाणेस कंपाऊंडच्या जाळ्या चोरीचा असे एकुण 05 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर चोरट्यांकडुन पाचही चोरीचे गुन्ह्यातील एकुण 3,67,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये तोन मोटार सायकली. एक चारचाकी वाहन व कंपाऊंडच्या जाळया. अॅल्युमिनीअमची तार असा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्ह्यात सराईत गुन्हेगारासह 03 आरोपी व एका अल्पवयीन बालकाचा सहभाग असुन तीन आरोपींना तपासकामी अटक करणेत आली आहे. यापूर्वी

सदर गुन्हयातील सराईत चोरट्याचे विरुध्द जबरी चोरी व चोरीचे एकुण 16 गुन्हे दाखल असून त्यास शाहुपूरी पोलीस ठाणेचे प्रस्तावावरुन मा. पोलीस अधीक्षक, सो सातारा यांनी 02 वर्ष कालावधीकरीता तडीपार केले होते.

अशा प्रकारे शाहपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सतर्क पेट्रोलींग करुन चारचाकी, दुचाकी, कंपाऊंडच्या जाळ्या. अॅल्युमिनीअमची तार चोरी करणारी व जबरी चोरी करणारी टोळी सराईत गुन्हेगारासह जेरबंद करून जबरी चोरी, वाहनचोरी व अॅल्युमिनीअम तार जाळ्या चोरीचे एकुण 05 गुन्हे उघडकीस आणुन आरोपींचेकडून मुन्यातील एकूण 3,67,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख पोलीस अधिक्षक सो. सातारा, मा. बापू बांगर अपर पोलीस अधिक्षक सो. सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेड का हसन तडवी, लैलेश फडतरे,पो.ना. अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सहा. फौजदार सतीश सावळे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट