सातारा जिल्हयातील भुईज परिसरात बेकायदा चोरटी विक्री करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी केले तडीपार…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :– सातारा जिल्हयामध्ये वाई तालुक्यातील भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदा चोरटी दारु विक्री करणारे टोळी प्रमुख
१) अशोक वामन जाधव, वय ५५ वर्षे, तसेच टोळी सदस्य
२) सविता अशोक जाचव वय ४८ वर्षे,
३) अमर अशोक जाधव, वय ५५ वर्ष,
४) अमित अशोक जाधव, वय १९ वर्षे, सर्व रा. देगांव ता वाई जि सातारा यांचंवर सातारा जिल्हयामध्ये टोळीने बेकायदा दारुच्ची चोरटी विक्री करणे, गंभीर दुखापत पोचवणे बाचतचे टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर गुन्हे दाखल असल्याने भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक रमेश गजे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक
सातारा यांचेकडे सादर केलेला होता.




सदर प्रस्तावाची चौकशी बी.वाय. भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी धाई विभाग यांनी केली होती.यातील टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशिर कारवाई करुनही ते
जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी फुल्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीला मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन १४ उपद्रवी टोळयांमधील ४६ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कड़क कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक, सातारा श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो.हवा प्रमोद सायंत, पो.कॉ. केतन शिवे, म.पो.कॉ.अनुराधा सणस, भुईंज पोलीस ठाणेचे पो.कॉ सोमनाथ बल्लाळ, सागर मोहीते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com