महाडमध्ये फिटनेस ट्रेनरचा महाड ते पनवेल दरम्यान विनयभंग करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड:- दिनांक 3 जुलै 2023 रोजी फिर्यादी महिला वय 20 वषै , धंदा -फिटनेस ट्रेनर, रहाणार मेहल सिंग कंपाऊंड, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रोड, खार पश्चिम, मुंबई यानी महाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संतोष जयराम शिंदे रहाणार बिरवाडी , ता.महाड, जि.रायगड याने त्याच्या मारुती सुझुकी क्र. एमएच 04 इएच 407 ही मध्ये आरोपीत यांचे सोबत पुढे बसुन महाड ते पनवेल जाणेकरीता प्रवास करीत असताना साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर पुढे गेले नंतर आरोपीत याने फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या मांडिला हात लावून तसेच फिर्यादी यांचे छातीवर उजव्या बाजुने हात फिरवून फिर्यादी यांचे मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले नंतर फिर्यादी या पुढील सिट वरुन मागील सिटवर जावून बसले असता आरोपीत याने गाडी चालवीत पुढे काही अंतरावर गेल्या नंतर सदर गाडी मधील आरशामधुन फिर्यादी याचे कडे पाहून फ्लाईंग किस करण्याचे ईशारे करुन डावा हात मागे करुन फिर्यादी याचे पायाला टच करुन काही ना काही अश्लील चाळे करुन फिर्यादी हिचे मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वारंवार कृत्य केले म्हणुन याची माहीती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354 , 354 अ अन्वये गुन्हा दाखल केला असून या गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार शेलार करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट