डोंगरदऱ्यातील छत्तीसगड सीमेलगत नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेला ग्राम- ‘मेहताखेडा’ येथे ग्रामीण महिलांचे मेळावा कार्यक्रमाचे आयोजन..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली “भव्य महिला मेळावा संपन्न झाला.

“पोलीस दादालोरा खिडकी” योजनेअंतर्गत “गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे ” पोलीस स्टेशन चिचगड च्या सौजन्याने ग्राम- (मेहताखेडा) येथे दिनांक -12 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा परिषद शाळा मेहताखेडा येथे “भव्य महिला” मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.. “पोलीस दादालोरा खिडकी” योजना व कम्युनिटी पोलिसांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले, ग्रामीण व आदिवासी नक्षल भागातील महिलांना व महिलांच्या बचत गट यांना अर्थसहाय्य करणे बाबत अर्थसहाय करून बँक अधिकारी यांना प्रत्यक्ष बोलावून मार्गदर्शन तसेच ‘कृषी विभागामार्फत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली… ग्रामीण आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्याच्या समस्येबाबत “आरोग्य शिबीर” ठेवण्यात आले होते…..सिकलसेल तसेच इतर गंभीर आजार तपासण्या करण्यात आल्या.. “ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांच्या “कबड्डी” सामन्यांचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते,

          गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत "कम्युनिटी पोलीससिंग" च्या माध्यमातून मा . पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून व  अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा,  यांच्या मार्गदर्शनाखाली, भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते... उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, श्री. विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करून सदरचा महिला मेळावा नक्षलग्रस्त आदिवासी भागातील महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या समस्या जाणून घेऊन व त्यांच्या समोरील आव्हाने व महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीने उपायोजना करून  या सर्व गोष्टींना न डगमगता सामोरे जाऊन   महिलांचे शिक्षित होणे ही काळाची गरज आहे, महिलांना आत्मविश्वासाने समाजात वाटचाल करता आली पाहिजे, आपण ग्रामीण भागातील असल्याने मनामध्ये कसल्याही प्रकारच्या संकोच न बाळगता प्रत्येक कामामध्ये महिलांचे योगदान हे अतिशय मोलाचे आहे हे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे यांनी अधोरेखित केले.

  ग्रामपंचायत "मेहताखेडा" आणि ग्रामस्थ यांच्याकडून पोलीस अधीक्षक यांचे 'आदिवासी' संस्कृतीने भव्य स्वागत करण्यात आले. 

           सदर  कार्यक्रमाकरिता वेगवेगळे महिला  बचत गट समूह, कष्टकरी, शेतकरी महिला, ग्रामपंचायत मेहताखेडा येथील सरपंच, उपसरपंच तसेच जिल्हा परिषद शाळा मेहताखेडा येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक पोलीस स्टेशन चिचगड चे ठाणेदार तुषार काळेल, पोलीस उपनिरीक्षक खासबागे तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार व कम्युनिटी पोलीस ची टीम यांनी सदर महिला मेळावा हा यशस्वीपणे पार पाडला.

         या मेळाव्यामध्ये नागपूर येथून आलेले 'रोटरी क्लब ऑफ नागपूर' व 'माऊली सेवा संस्था नागपूर' यांच्याकडून *शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट