पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे क्रीडा शिक्षकांसाठी चर्चासत्राचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर : बोईसर शालेय खेळात प्रथमोपचार अत्यंत महत्वाचे- डॉ. कुलकर्णी
सन 2023-24 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा वरती प्रथमच ,एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
सदर चर्चासत्र हे तारापूर विद्या मंदिर, एमआयडीसी बोईसर या ठिकाणी संपन्न झाले. सन 2023-24 सालच्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांचा आढावा व पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धांसाठी सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तालुका क्रीडा केंद्रप्रमुख व जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सुहास वनमाने यानी 2022 साली 21 हजार खेळाडू सहभागी झाले होते व 2023 रोजी पालघर जिल्ह्यातील सहभाग हा 39 हजार विदयार्थी विद्यार्थिनीचा असल्याचे सांगत,याचे सर्व श्रेय जिल्हा क्रीडा समन्वयक आशिष पाटील,तालुका क्रीडा केन्द्र प्रमुख श्री.पळसुले,श्री गायकवाड,श्री.थोरात,श्री पारगावकर,श्री किणी,श्री.पारखे,श्री पवार, व श्री योगेश चौधरी व पालघर जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिकाकांचे असल्याचे सांगितले.क्रीडा शिक्षकांनी एक जुटिने काम केल्यास पालघर जिल्ह्यातून श्वास क्रीडा ,ध्यास क्रीडा या टॅगगलाईन प्रमने 100 ऑलिंपियन घडविण्याच्या माणस क्रीडा शिक्षकांनी उराशी बाळगले पाहिजे असे सांगितले.

पालघर जिल्ह्यातील एकूण 105 शिक्षक या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिले सदर चर्चा सत्र दरम्यान बोईसर येथील प्रसिद्ध आशीर्वाद क्लिनिक चे डॉ. कुलकर्णी सर यांचे प्रथमोपचार वरती व्याख्यान झाले. कु. दिशा जिल्हा क्रीडा कार्यालय तर्फे विद्यार्थांना, व शिक्षकांना ऑनलाइन नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबाबतीत मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुका क्रीडा केंद्रप्रमुखांनी आपल्या तालुक्यात होणाऱ्या स्पर्धांचा अहवाल व जिल्हा स्तरीय स्पर्धेच्या बाबतीत स्तर कसा उंचावला जाईल याबाबतीत मत मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी पालघर तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्री डरेल डिमेलो यांनी सुद्धा मुख्याध्यापकांना क्रीडा शिक्षकांकडून काय अपेक्षा असते याबाबतीत आपली सडेतोड मत मांडली.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे येणारे जी.आर. हे जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत आले तर त्याचा जास्त परिणाम होईल व ज्या शाळा आता खेळात सहभागी होत नाहीत त्यांचा सुद्धा सहभाग कसा वाढेल याबाबत सूचना केल्या. पालघर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे चर्चासत्र राज्यस्तरावर सुद्धा झाले पाहिजे, अशी सूचना केली.या वेळी पालघर जिल्यातील संगटणा प्रतिनिधी पण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तारापूर विद्यामंदिरच चे क्रीडा शिक्षक श्री प्रकाश पळसुले यांनी आपले आयोजन कौशल्य दाखवत कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किरण थोरात यांनी केले आशिष पाटील व राम पाटील यांनी आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com