विना परवाना अग्निशस्त्र बाळगणारे एका गुन्हेगारास अटक ५०,४००/- रु. किंमतीचे ०१ अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतुस हस्तगत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली : – मिरज शहर पोलीस ठाणे

गु.र.नं. ३३८/२०२४, आर्म अॅक्ट ३.२५ प्रमाणे

गु.घ.ता. वेळ

दिनांक २२.१०.२०२४ रोजी २३.१० वा. मिरज शहरातील गणेश तलावा जवळुन आळतेकर हॉल कडे जाणारे रोडवर

दिनांक २२.१०.२०२४ रोजी

फिर्यादी नाव

पोना/२१२७, अनंत कुडाळकर, नेम स्था.गु.अ. शाखा, सांगली

माहिती कशी प्राप्त झाली

पोना/२१२७, अनंत कुडाळकर, पोकों/१६०२, सोमनाथ पतंगे,

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोहया / अमोल पैदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, सतिश माने, पोकों सोमनाथ पतंगे

वेळ दिनांक दि. २२.१०.२०२४ रोजी

अटक आरोपीचे नावे व पत्ते

१) ऋषीकेश सुर्यकांत कुंभार, वय २४ वर्षे, पत्ता कुंभार गल्ली, गुरुवार पेठ मिरज

२) मलीक शेख, सांगली

जप्त मुद्देमाल

१) ५०,०००/- रु किंमतीचे लौखडी धातुचे सिल्व्हर रंगाचे एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीन व हॅमर सह जु. वा. किं. अं. २) ४००/- रु. किंमतीचे ०१ जिवंत राऊड जु. वा. किं. अं.

५०,४००/- (पन्नास हजार, चारशे रुपये मात्र) गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४ ची निवडणुक आदर्श आचारसंहिता लागु झालेली असुन त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सदर सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स.पो.नि. नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.

त्या अनुशंगाने दि. २२.१०.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स.पो.नि, नितीन सावंत यांचे पथकातील पोना/२१२७, अनंत कुडाळकर व पोकॉ/१६०२, सोमनाथ पतंगे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे ऋषीकेश कुंभार हा अवैध अग्निशस्त्र कब्जात बाळगुन मिरज शहरातील गणेश तलावाकडुन आळतेकर हॉलकडे जाणारे दत्ता सप्लायर्स विट व वाळु डेपोजवळ थांबला आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे दत्त विट व वाळु सप्लायर्स पासुन रोडचे बाजुस काही अंतर अलीकडे वॉच करीत थांबले असताना बातमीप्रमाणे फुटपाथवर एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सपोनि / नितीन सावंत व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव ऋषीकेश सुर्यकांत कुंभार, वय २४ वर्षे, पत्ता कुंभार गल्ली, गुरुवार पेठ, मिरज असे असल्याचे सांगितले. त्यावेळी सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पँटचे उजवे खिशात एक काडतुस व कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह मिळून आला. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगुन सदरचे अग्नीशस्त्र व काडतुस हे त्याचा मित्र मलिक शेख याचेकडुन काही महिन्यापुर्वी विकत घेतले असल्याचे सांगितले. लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुस पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोना / अनंत कुडाळकर यांनी मिरज शहर, पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्डा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर, पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात
आला असुन पुढील तपास मिरज शहर, पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट