महाडमध्ये मौजे धारवली येथे तांब्याचे ३ हांडे चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
पोलादपूर:
दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 ते 28 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 03 : 30 चे दरम्यान मौजे धारवली ता.महाड, जि.रायगड येथे फिर्यादी श्री. उस्मान गुलाम चाफेकर वय 86 वर्षे यांच्या रहाते घरी आरोपी 1) मंगेश धोंडू शिंदे वय 52 रहाणार धारवली ,ता.पोलादपूर ,जि.रायगड आणि 2) समीर राम चव्हाण वय 42 वर्षे राहणार भावे, ता.महाड, जि.रायगड यानी पाणी भरण्याचे मोठ्या आकाराचे तांब्याचे एकुण 3 हंडे फिर्यादी श्री. उस्मान यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादाने स्वतःच्या फायदया करीता चोरुन नेले म्हणून याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. म्हस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांचा मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात कलम 380,34 अन्वये गुन्हा दाखल केला असून यापुढील तपास पोलीस हवालदार श्री. सुतार करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com