पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगार पती विरोधात गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:
महाड तालुक्यातील ढालकाठी बेलदारवाडी येथील घटना,
आरोपी अनिल चव्हाण यांच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल
सविस्तर माहिती अशी की फिर्यादी उषा अनिल चव्हाण हिने दुपारच्या सुमारास किरकोळ वादामुळे महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे स्वतःच्या पत्ती विरोधात तक्रार नोंदवली होती.
तक्रार नोंदवल्यामुळे उषा चव्हाण हिच्या पतीला तहसीलदार कार्यालयात हजर करण्यात आले होते. या गोष्टीचा राग मनात घेऊन आरोपी अनिल चव्हाण यांनी स्वतःच्या पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अनिल चव्हाण याने पत्नीवर दगड हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केली. जखमी पत्नीला महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता त्वरित हलविण्यात आले यामुळे मोठा अनर्थ टळला. स्वतः पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी अनिल लहू चव्हाण मूळ रा. बिबेवाडी, जिल्हा पुणे,, सध्या राहणार ढालकाठी, बेलदारवाडी तालुका महाड, असे आरोपीचे नाव असून संबंधित आरोपी विरोधात 323,324,504,506 अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com