पत्नीच्या अनैतिक संबंधातून तिच्या प्रियकराला पतीकडून बांबूने जबर मारहाण गुन्हा दाखल..

उपसंपादक- राकेश देशमुख

महाड:-महाड तालुक्यातील बिरवाडी आसनपोई येथील घटना..!
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसनपोई गावात एक आगळा वेगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे, आसनपोई गावात भाडयाने राहणारे दाम्पत्य महेश गंगाप्रसाद कोल (वय वर्षे २९) व श्यामकली महेश कोल (वय वर्षे २५) राहणार मध्यप्रदेश सद्या राहणार आसनपोई, बिरवाडी या दोघा पती पत्नीने फिर्यादी लाले राम गोपाल रावत (वय वर्षे ३३) राहणार मध्यप्रदेश सद्या राहणार शेलटोळी बिरवाडी याला घरी बोलावून जबर मारहाण केल्याने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी लाले राम गोपाल रावत याचे आसनपोई येथे भाड्याने राहणारे महेश कोल याची पत्नी शामकली महेश कोल हिच्या बरोबर गेल्या एक वर्षापासून अनैतिक संबंध होते, याची खबर शामकली हिचे पती महेश कोल याला लागताच आपल्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या लाले राम गोपाल रावत याला सोमवार दिनांक 4 मार्च रोजी आपल्या आसनपोई येथील घरी बोलावून महेश गंगाप्रसाद कोल याने लाले राम गोपाल रावत याच्या डोक्यात बांबूच्या साह्याने मारुन जबर मारहाण केली, घटनेची माहिती महाड एमआयडीसी पोलीसांना मिळताच मारहाणीत जखमी झालेल्या लाले रामगोपाल रावत याला पोलिसांनी बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी माणगाव उप जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे, जखमी लाले राम गोपाल रावत याच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरोधात भारतीय दंड विधान कलम 324, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001