पोलादपूर तालुक्यातील गणेश नगर येथे घरफोडी..अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल… पोलिसांकडून तपास सुरू…

0
Spread the love

उपसंपादक, राकेश देशमुख

पोलादपूर :-पोलादपूर तालुक्यातील काटेतळी रोड जवळील गणेश नगर हद्दीतील एका बंद घरामध्ये घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराचा फायदा घेऊन सुमारे 51 हजार रुपयाच्या घरसामानाची चोरी केली आहे.

फिर्यादी सुनील रघुनाथ जगताप यांनी याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील बॅटरी, इन्वर्टर, पाण्याचा बंब, तांब्या पितळेची कळशी, हांडे, असे एकूण 51 हजार रुपयाचे घर सामान चोरट्याने लंपास केले आहे. अज्ञात चोरांचा तपास करण्यासाठी श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट