लोकसभा निवडणुक – २०२४ संदर्भात खोटी माहिती सोशल मिडीयावरून प्रसारीत करणान्या इसमा विरूद्ध गुन्हा दाखल…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :-लोकसभा निवडणुक – २०२४ च्या अनुषंगाने दि. १६/०३/२०२४ पासुन सांगली जिल्हयात आदर्श आचरसंहिता लागु असताना दिनांक ०४.०५.२०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने रविकांत पिंगळे या नावाने सोशल मिडीयावर “दीड लाखांच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार, पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न” असा आशयाचा मथळा देवुन लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये सांगली लोकसभा मतदार संघात कोण निवडुन येणार याबाबत लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणताही अधिकृत अहवाल प्रसारित केला नसताना सुध्दा खोट्या पोलीस अहवालाच्या संदर्भाने बातमी तयार करून ती सोशल मिडीयावरुन प्रसारीत करुन निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचे उद्देशाने खोटी माहिती प्रसिध्द केली आहे. लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सोशल मिडीयावरून खोटी बातमी प्रसारीत करणाऱ्या सदर व्यक्तीविरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी सांगली पोलीस दलामार्फत आवाहन करण्यात येते की, निवडणुक आदर्श अचारसंहिते दरम्यान गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअप, फेसबुक, इंन्स्टाग्राम व इतर सोशल मिडीयावरून कोणत्याही बातमीची खातरजमा न करता खोटी बातमी तयार करून ती प्रसारीत करणे, पुढे पाठविणे तसेच निवडणुकीच्या अनुशंगाने अफवा पसरविणे असे कृत्य कोणीही करू नये. सायबर पोलीस ठाणे सांगली मार्फत सोशल मिडीयावर करडी नजर ठेवली जात असुन असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध आदर्श अचारसंहिता भंग व इतर कायद्याप्रमाणे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com