पालघर शहर येथील डॉ.आंबेडकर नगर (पूर्व) येथे मोठ्या उत्सवाने क्रिकेटचे सामने संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– आजच्या काळात सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे़, ह्या क्रिकेटच औचित्त साधून पालघर पूर्व डॉ.आंबेडकर नगरमध्ये शेलार भिवंडी जि. ठाण्याचे प्रसिद्ध उद्योजक उमेश अनंता सोनावणे व त्यांचे आधारस्तंभ महेशजी चौगुले साहेब आमदार- भिवंडी पश्चिम यांच्या सौजन्याने तसेच दिवंगत मंजुळा अनंत सोनवणे यांच्या स्मरणार्थ विराज ग्रुप १२०० भीम चषक २०२४ हे आयोजन करण्यात आले होते. ह्या क्रिकेट सामन्याचे आयोजन निशुल्क करण्यात आली होती. कुठल्याही संघा कडून कोणतीही प्रवेश फी न घेता संघ खेळवण्यात आले.

क्रिकेट सामने विनामुल्य भरवण्याच एकच उद्दीष्ट की समाजातल्या होतकुर मुलांना भाग घेता यावा आणी सर्वानी सामाजीक एकोपाने राहावे हा एक उमेश सोनावणे ह्यांच उदीष्ट होता.

ह्या भिम चषक २०२४ च्या क्रिकेट सामण्यामध्ये भिवडी , वंसई, पालघर, वाडा अश्या एकूण ३० ते ४० संघाने सहभाग नोदवला होत. त्या मध्ये प्रथम पारितोषिक व रोखरक्क्म वंसई संघाने पटकारल व द्वितिय पारितोषीक व रोखरक्क्म कंचाड वाडा ह्या संघाने पटकारल ह्या सामन्याला प्रमुख पाहूणे म्हणून उपस्तीत उद्योजक उमेश सोनावणे भिवंडी , आर पी आय पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव , काँग्रेस पक्षनेते पंकज गायकवाड, पोलीस बॉईज संघटना पालघर जिल्हा महासचिव तथा पत्रकार मंगेश उईके , पत्रकार ऋषीकेश जाधव व इतर पक्षाचे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

ह्या क्रिकेट सामन्याचे आयोजन संदिप राऊत ( हाडू ) पालघर ह्यानी केल होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट