महाड किंजळघर येथे एका ५५ वर्षीय महिलेची मानसिक त्रासाला कंटाळून नदीमध्ये उडी मारून आत्महत्या..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड:– सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी ८ वाजताच्या सुमारास सावित्री नदीच्या पात्रातील पाण्यात मौजे दादली येथील पुलावरून उडी मारून कींजळघर येथील मयत वासंती अनंत केसरकर हिचा मृत्यू झाला आहे.

सदर महिला हिस ४ वर्षापासून मानसिक त्रास होता . तसेच तिच्यावर ठाणे येथे उपचार चालू होते.

सदर आजार बरा होत नसल्यामुळेच कंटाळून तीने दादली पुलावरून सावित्री नदीच्या पाण्यात उडी मारल्यामुळे तीचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

या घटनेचा तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीक हवालदार श्री. गुरव यांनी पुर्ण केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट