दिवेआगर येथील स्विमिंग पूल मध्ये पडून एका ५ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

दिवेआगर: दिवेआगर येथे पर्यटनासाठी आलेल्या पाच वर्षाच्या अविष्कार चा इलाईट रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक कोकणात मुंबई पुण्यातून येत असतात त्याचप्रमाणे पुण्यातील सावरदारी या गावातील खेड तालुक्यातील येळवंडे कुटुंबीय मित्र परिवारातील तीन कुटुंबांसह पर्यटनासाठी दिवेआगर येथे आले होते.


आदल्या दिवशी दिवेआगर समुद्रकिनारी फिरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश येळवंडे आपली गाडी धुण्यासाठी गाडी जवळ आले असताना छोटा अविष्कार त्याचे वडील अविनाश यांच्यासोबत हॉटेलच्या रूम बाहेर आला. गाडी धुताना छोटा अविष्कार आपल्या पासून दूर जाऊन रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये कसा व कधी पडला हे अविनाश यांच्या लक्षात आले नाही. थोड्यावेळाने अविष्कार कोठे आहे याची शोधाशोध केली असता तो स्विमिंग पूल मध्ये पडलेला त्यांना आढळला. त्वरित बोर्ली पंचतन येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेऊन अविष्कार ची वैद्यकीय तपासणी केल्यावर येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत तिघी सागरी पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू नोंदवला जाऊन पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रसाद ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सचिन निमकर हे पुढील तपास करत आहे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट