वरंध-धरणाची वाडी येथे अपघात होऊन एका 47 वर्षीय इसमाचा ट्रॅक्टरची ट्राली घसरल्याने जागीच मृत्यू…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड :


महाड तालुक्यातील वरंध - धरणाची वाडी येथे ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका 47 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सतीश संपत देशमुख राहणार- वरंध असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो स्वतः ट्रॅक्टर चालवीत असल्याची माहिती मिळाली आहे.
काल सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास सतीश संपत देशमुख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर शेतातील सर्व काम आटोपून धरणाची वाडी जवळील रोड वरून येत असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली नाल्यामध्ये पडली यामुळे संपूर्ण ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि यामध्ये सतीश संपत देशमुख गंभीरित्या जखमी झाले, जखमी सतीश देशमुख यांना महाड ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करीता दाखल करण्यात आले होते परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार 106 (1),125(A),125(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बोटे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.