बिरवाडी शहरांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका 38 वर्षीय इसमाचा मृत्यू…
प्रतिनिधी-राकेश देशमुख

बिरवाडी : काल दिनांक १ मार्च २०२३ रोजी बिरवाडी शहरातील माधव कॉम्प्लेक्स येथील एका इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सविस्तर माहिती अशी की रेखा प्रदीप नायक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत प्रदीप ब्रह्मबरा नायक वय 38 रा. माधव कॉम्प्लेक्स बिरवाडी, मूळ राहणार ओडिसा, हे रात्री झोपेतून उठून लघुशंके करिता बाथरूम मध्ये गेले असता त्यावेळी त्यांचे शरीर थरथर कापत असल्याने त्यांची पत्नी रेखा यांनी त्यांना प्राथमिक उपचारकरिता बिरवाडी सरकारी रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर मृत्यूची महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एडवळे व पोलीस हवालदार सौ. उमरटकर या करीत आहे.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com