पालघरमध्ये अति उष्माघातामुळे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पहिला बळी..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-16 वर्षांच्या अश्विनीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात
राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असून पालघर, मुरबाड, ठाणे, रायगड या जिल्हातील पारा चाळीशी पार गेला आहे. 15 एप्रिल रोजी मुरबाडमधील तापमान सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या केव (वेडगेपाडा) येथे राहत होती. अश्विनी विनोद रावते असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती 16 वर्षांची होती.
अश्विनी एस.पी.मराठे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज मनोर येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती.
11 वीच्या परीक्षेचा पेपर देऊन सोमवारी अश्विनी घरी आली.
परंतु घरी कोणी नसल्यामुळे ती आई वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली. मात्र आई शेतातवरून कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. आणि वडील
मनोर येथे बाजाराला गेले होते.परंतु घरी कोणी नसल्यामुळे ती आई वडिलांना शोधण्यासाठी शेतावर गेली. अश्विनी शेतावर गेली असता तिथेच तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली.
दुपारच्या सुमारास शेतात कोणीच नसल्यामुळे तब्बल दोन तास अश्विनी उन्हातच पडून होती. त्यानंतर आई घरी आल्यानंतर अश्विनीची कॉलेजची बॅग दिसल मात्र अश्विनी कुठे दिसत नाही हे पाहून अश्विनीची आई तिला शोधण्यासाठी पुन्हा शेतावर गेली. तेव्हा अश्विनी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसून आलं.
त्यानंतर अश्विनीला तत्काळ मनोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अश्विनीच्या मृत्यूने परिसरात शोक-कळा पसरली आहे. सध्या उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून विक्रमगड तालुक्यामध्ये सोमवारी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर आज त्यात वाढ होऊन 42 अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे.
मीडियाच्या माध्यमातून प्रशासन सर्वांनी आपली काळजी घ्या असे आव्हान करीत आहेत. सर्वांनी आपली काळजी घ्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com