10 वर्षीय गोरेगाव येथील हरविलेल्या मतिमंद मुलाला एम.एच बी काॅलनी पोलीसानी 5 तासामध्ये शोध लावून त्याचे आईच्या ताब्यात दिले…

उपसंपादक-रणजित मस्के
गोरेगांव: दि २६/५/२३ रोजी एम एच बी पोलीस ठाणे परिसरात एक्सर रोड मेट्रो स्टेशन बोरवली पश्चिम मुंबई या ठिकाणी मुलगा नामे दुर्गेश केशव वर्मा वय १२ वर्षे हा मिळून आल्याबाबत कंट्रोल वरून कॉल प्राप्त झाला असता एम एच बी पोलीस ठाणे निर्भया पथक यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणले .
दिवस पाळी ठाणे अंमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खोसे यांनी सदर मुलाची सविस्तर विचारपूस केली असता त्याला त्याचे नाव व्यवस्थित सांगता येत नव्हते तसेच त्याच्या घरचा पत्ता माहीत नव्हता तो फक्त गोरेगाव मध्ये राहतो असे सांगतले व सदर मुलगा हा मतिमंद असल्याचे आढळून आले

तरी सदर मतिमंद मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे व पोलीस ठाणे हरवलेल्या पथकास योग्य त्या सूचना देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम एच बी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद मुलाच्या पालकांचा शोध घेणे कामे पोलीस ठाणेमधून पोलीस योग्य त्या मार्गदर्शक सूचना देऊन हवालदार १६६२०/भिंगले, महिला पोलीस शिपाई १४२४८८/भोसले व चालक पोलीस शिपाई पवार हे गोरेगाव परिसरामध्ये पाठवले असता पथकाने त्याच्या पाच तास कौशल्यपणे घराचा शोध घेऊन सदर मुलास त्याची आई नामे पुष्पादेवी केशव वर्मा व 42 वर्षे मो क्र ७५२५०६६३८८ यांच्या ताब्यात सुखरूप दिले .
अशी माहिती श्री. सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com