सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला कुरार पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

प्रतिनिधी-अतिष सकपाळ

मुंबई: मालाड कुरार पोलीस ठाण्यात दिनांक 30 डिसेंबरश2021 रोजी रात्रपाळी कर्तव्यावर असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त दरम्यान दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी रात्री 2 ते 5 या कालावधीत रोशन वाईन शॉप, तानाजी नगर, कुरारगाव, मालाड पूर्व, मुंबई येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील तपासादरम्यान प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस शिपाई वेदांते यांना ऋचिका पॅलेस, आदर्श नगर, मालाड पूर्व, मुंबई या ठिकाणी एक ऑटो रिक्षा मध्ये काही संशयित इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने टेहाळणी करत असल्याचे आढळून आले. त्याबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाला ताबडतोब माहिती देऊन त्या ठिकाणी ऑटो रिक्षा घेऊन फिरणारे संशयित इसमांना हटकले असता रिक्षातील पाच पैकी चार इसम रिक्षा रोडवर सोडून अंधाराचा फायदा घेऊन गल्लीबोळातून पळून गेले.

तसेच एक आरोपी पळत असताना त्यास पोलीस शिपाई वेदांते यांनी पाठलाग करून जेरबंद केले.

त्या वेळी सदर आरोपीने पोलीस शिपाई श्री. वेदांते यांच्यासोबत झटापट करून त्याच्या जवळील पेपर स्प्रे वेदांते यांच्या डोळ्यावर फवारून तसेच उजव्या हाताच्या पंजावर हाताने मारहाण करून दुखापत केली.

त्यावेळी मदतीला आलेल्या पथकाने नमूद आरोपीतास जागीच जेरबंद करून ताब्यात घेतले आणि त्याच्यावरती कलम 399,402,353 भारतीय दंड विधान सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा सह 37 ( 1 ),(अ) महाराष्ट्र पोलीस कायदयानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीची माहिती घेतली असता त्याचे नाव हरुण जैदुल सरदार वय 35 वर्षे राहणार गावदेवी मंदिराजवळ, लक्ष्मी नगर, राठोडी, मालवणी, मालाड पश्चिम मुंबई येथील असून त्याचा पूर्व अभिलेख पाहता घरफोडीचे व जबरी चोरीचे एकूण ४३ अपराध चारकोप, गोरेगाव, कुरार, आंबोली, मालाड, मालवणी, दिंडोशी, कांदिवली, कस्तुरबा, जोगेश्वरी, एम आय डी सी या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

आरोपी सोबत असलेल्या इतर चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत ते सर्व मालवणी परिसरातील असून त्यांचा शोध घेण्याकरता पथक मालवणी कडे रवाना केले आहे.

हस्तगत हत्यारांचे वर्णन-
1) दोन कटावणी (एक मोठी व एक लहान आकाराची )
2) दोन मोठे स्क्रू ड्रायव्हर
3) एक धारदार कोयता
4) एक पक्कड
5) एक ऍडजेस्टेबल मोठा मेकॅनिकल पाना
6) एक मजबूत लाकडी दांडा
7) एक मिरची पावडर चे पाकिट
8) एक सेल्फ डिफेन्स करता असलेले पेपर स्प्रे
9) नायलॉन रस्सी
10) एक ब्लेड
11) एक चादर
12) ऑटो रिक्षा क्रमांक MH47 AD 9635

अटक आरोपीं:-
1) हारुण जैदुल सरदार वय ३५ वर्षे राहणार गावदेवी मंदिराजवळ, लक्ष्मी नगर, राठोडी, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई

गुन्हे अभिलेख :- एकूण ४३ घरफोडी चोरी व जबरी चोरी चे मुंबई मधील विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्हे

तपासी अधिकारी:- कुरार पोलीस ठाणे

सपोनि श्री. नितीन गिजे
मार्गदर्शन पोलीस निरीक्षक श्री. मनोज चाळके (प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

रात्रपाळी पर्यवेक्षक पोलीस
निरीक्षक
श्री .प्रसाद पितळे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट