दिव्यात कृष्णामुर्ती क्लासमधील मुलीला बेदम मारहाण शिक्षिका दिवा पोलीसांच्या ताब्यात…

उपसंपादक – रणजित मस्के
ठाणे:– दिव्यात खासगी क्लासेस मधून शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थिनीला दिवाळीचा अभ्यास न करण्याच्या शुल्लक कारणावरून लाकडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
कृष्णामूर्ती क्लासेस मध्ये शिकणाऱ्या १२ वर्षीय मुलीच्या हात, पाय व पाठीवर असंख्य वळ उठविले आहे.
मुलीच्या पालकांनी तत्काळ दिवा पोलीस चौकी (मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत) येथे तक्रार करताच पोलीसांनी आरोपी शिक्षिकेवर त्वरित गुन्हा दाखल केला आहे.
दिवाळीचा अभ्यास केला नाही म्हणून व दिवाळी होऊन कित्येक दिवस झाले असताना सुद्धा पुन्हा तोच अभ्यास करून घेण्यास शिक्षिकेने जबरदस्ती करत मुलीला मारहाण करत मला अभ्यासाचे नाही तर तुझी आई मला ओरडते का याच करणामुळे मी तुला मारले आहे, असे शिक्षिकेने मुलीला मारते वेळी रागाच्या भरात सांगत होती, असे पोलीस जबाबात मुलीने स्पष्ट केले आहे.
सदर घटनेची मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीसांनी योग्य दखल घेत क्लासेसच्या महिला आरोपी टीचरवर गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com