गोंदियात सालेकसा पोलीसांनी 16 गोवंशिय जनावरांची सुटका करून आरोपींवर केली कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक – 18-12- 2023 रोजी सालेकसा येथील पोलीस पथक रात्र गस्त करीत असताना पथकास गुप्त बातमीदार कडून माहीती मिळाली की, मौजा- नाकानिंबा या गावाजवळ असलेल्या जंगल परिसरातुन अवैध रित्या चारचाकी वाहनाने जनावरांची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळाल्याने सदरची माहिती पो.नि. बाबासाहेब बोरसे ठाणेदार सालेकसा यांना कळवून त्यांचे आदेशान्वये गुप्त माहीतीच्या आधारे दिनांक-18-12-2023 रोजी रात्रौ 00:50 वा. नाकानिंबा जंगल परिसरात कारवाई केली असता जंगल परिसरात एक फोर्ड कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एम. एच.31 सी.आर. 8811 संशयितरित्या दिसून आल्याने सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनात कोणीही ईसंम दिसुन आले नाही…. तसेच वाहनाचे आतमध्ये 6 नग गोवंश जातीचे गाय, गोरे अशी जनावरे दाटीवाटीने डांबून ठेवलेली दिसून आली…..तसेच वाहनाचे बाजुला 10 हा मोठे गोवंश जातीचे गाय, गोरे अशी जनावरे दोरीने एकमेकांना दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे दिसून आल्याने एकुण 16 नग गोवंश जातीचे जनावरे एकूण किमती अंदाजे 1 लाख 20 हजार रुपयांची व चारचाकी वाहन. एम. एच. 12 सीआर-8811 किमती 3 लाख रु. असा एकुण 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर चारचाकी वाहनाचा अज्ञात चालक याचे विरुध्द पो.स्टे. सालेकसा येथे अप. 454/2023 कलम 5(अ)(2), 6, 9 प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 11(1) (ड) (ई) (फ) (ह) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा 1960 अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.ना.उईके करित आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाबासाहेब बोरसे , पो.उप.नि.अजय पाटील, पो.शि. इंगले, चापोना अग्नीहोत्री पो.स्टे. सालेकसा यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com