मनसे आमदार राजू पाटील यांच्या दिवा स्टेशन पूर्वेच्या तिकीटघर मागणीला अखेर मोठे यश …!

प्रतिनिधी- अभिजित माने
ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत मनसे मा.आ.राजु पाटील यांनी पाहणी करून तिकीट घरासाठी जागा निश्चित केली आहे. दिवा रेल्वे स्थानकात प्रवाश्यांना तिकिटांसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.

एकच तिकीट घर असल्याने तिकीट घरांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. या प्रवाश्यांच्या मागणी नुसार कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी मध्य रेल्वेकडे मागणी केली होती.
अखेर मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश आले असून दोन महिन्यात दुसर तिकीट घर हे दिवा रेल्वे स्थानकात उपलब्ध होणार आहे.

दिवा शहर परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्याला आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिवा रेल्वे स्थानकात तिकीट घरांची कमतरता दिसून येत होती.
दिवा रेल्वे स्थानकांमधून दररोज दहा हजार पेक्षा अधिक तिकिटांची विक्री होत आहे. मात्र दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला तिकीट घर असून दररोज तिकिटासाठी प्रवाश्यांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते.
विशेष म्हणजे दिवा व परिसरातील ८०% लोकसंख्या पूर्वेला आहे. मात्र तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना पूर्वेतून पश्चिमेला जावे लागत होते.
याबाबत प्रवाशांना होणारा त्रास मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्री शलभ गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
यावेळी दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना सामना करावा लागत असलेल्या समस्यांचा पाढा मनसेच्या शिष्ठ मंडळाने विभागीय व्यवस्थापकांसमोर मांडला होता.
अखेर मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला मोठे यश आले असून येत्या दोन महिन्यात दिवा पूर्वेत देखील तिकीट घर सुरु होणार आहे.
नव्याने सुरु होणाऱ्या तिकीट घराच्या जागेची पाहणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
यावेळी रेल्वेचे डी.सी.एम श्री धिरेन सिंग,ए. डी. इ.एन श्री शर्मा ,स्टेशन प्रबंधक श्री संजय घारगे, ,मनसे रेल्वे अध्यक्ष श्री. जितु पाटील, मनसे दिवा विभाग अध्यक्ष श्री. तुषार पाटील व असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com