शाळांबाबत बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मोठा निर्णय…!

मुंबई प्रतिनिधी :- अभिजित माने
मुंबई : दिनांक 3 जानेवारी 2022 च्या शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

सध्यस्थितीत जगातील काही देशांमध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रभाव वाढत असल्याने, मुंबईतील एकूण कोरोना -१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेता हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी ( इ .१ ली ते इ. ९ वी व ११ वी ) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा मा. आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या मान्यतेने दि.०४ जानेवारी २०२२ ते दि . ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत असल्याचे आदेश शिक्षणाधिकारी यानी दिले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com