टेंपोची काच फोडुन १ लाख ४ हजार ५७५ रु रोख रक्कम असलेली बैंग चोरी केलेबाबत दाखल गुन्हयाचा बनाव भुईज पोलीसांकडुन उघड, ४ आरोपीना अटक करुन गुन्हयातील संपूर्ण मुददेमाल व वापरलेले वाहन हस्तगत.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक ३०/११/२०२३ रोजी २१:०० वा सुमारास यातील फिर्यादि त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे व मयुर आनंदराव किर्यत यांचे सोबत मेडिकल औषधाच्या बॉक्स ची विक्री करुन मिळालेले १,०४,५७५/- रुपये एका ग्रे रंगाच्या बॅगमधुन त्यांचे साथीदार यांचे मालकिचा टैम्पो महिंद्रा सुप्रो क्र.एम एच ११ सी एच ९३७५ मधुन वाई ते पाचवड मार्गे जात असताना मौजे आसले (कुंभारवाडी) ता. वाई गावचे हदिदत आलेनंतर फिर्यादि यांच्या गाडीतील साथीदारास टॉयलेट ला लागलेने तसेच दारुच्या दुकानातुन विकत घेतलेली दारु पिणेसाठी टैम्पो रोड च्या कडेला उभा करुन लॉक केला व ते बाजुच्या शेतात गेले. थोडया वेळाने ते तीघेही परत आले असता त्यांना टॅम्पोची डाव्या बाजुची काच फुटलेली दिसली व टैम्पोतील पैशाची बॅग चोरी झालेचे लक्षात आले, वगैरे मजकुरचे /खबरीवरुन भुईज
पोलीस ठाणे गु.र.नं. ५०७/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघड करणेबाबत मा. श्री समीर शेख, भा.पो.से. पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा.श्री.बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग यांनी सुचना दिल्या होत्या.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने स.पो.नि. श्री रमेश गर्जे यांनी स्टाफ सह घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. असता फिर्यादी व त्याचे साथीदार यांचेकडे सदर घटले प्रकाराबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. म्हणुन त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता फिर्यादीसोबत असलेले त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे व मयुर आनंदराव किर्दत त्यांनी त्यांचे सातारा येथील इतर २ साथीदार यांचेसोबत संगणमत करुन गुन्हयाचा कट रचुन फिर्यादीला शेतामध्ये पुढे पाठवुन पाठीमागे सदर पैशाची बॅग त्यांचे साथीदारांकडे देवुन, गाडीची काच फोडुन चोरीचा बनाव केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे सातारा येथील त्यांचे साथीदार यांना देखील लगेच ताब्यात घेवुन चारही आरोपींना गुन्हयात अटक करुन त्यांची मा. न्यायालयाकडुन २ दिवस पोलीस कोठडी घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील थोरीस गेलेली १ लाख ४ हजार ५७५ रु रोख रक्कम असलेली बॅग हस्तगत करण्यात आलेली आहे.

श्री. समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा. श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री.बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि रमेश गर्ने, पोउनि. विशाल भंडारे, स.फौ. अवघडे, स.फौ राजे, पो. हवा. नितीन जाधव, पो. हवा. राजाराम माने, सुहास कांबळे, पोना सुशांत धुमाळ, पो कॉ. रविराज वर्णकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर ४ तासात उघडकीस कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.

आरोपींची नावे –

1) राहुल अंकुश गोळे वय २६ वर्षे रा. जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा

2) ओमकार रमेश गोळे वय १८ वर्षे रा जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा

3) अभिजीत अंकुश गोळे वय ३४ वर्षे रा. जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा

4) मयुर आनंदराव किर्दत वय ३२ वर्षे रा करंजे पेठ सातारा

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट