सांगली जिल्हयातील मांगरुळ येथे नालंदा अभ्यास केंद्रात १४ वा वर्धापनदिन साजरा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :– दिनांक १/१२/२०२३ रोजी ठिक सायंकाळी ६ वाजता नालंदा अभ्यास केंद्र मध्ये १४ वा वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी व अध्यक्ष मा.प्रा. संजयजी बनसोडे सर, प्रधान सचिव महा.अं नि स , मा.प्रा. विजयकुमार जोखे सर जिल्हा अध्यक्ष महा अं नि स , मा. प्रा. S B माने सर , मा. दिपक कांबळे भाऊ (DYSP लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद) मा. तानाजी आढाव सरपंच मांगरुळ, मा. विशाल जी खांडेकर सर संस्थापक देशभक्त करिअर ॲकडमी मांगरुळ, मा. दगडू शेणवी गुरुजी, मा. मिलींद पाटील सर, मा. मनोज जी मस्के पत्रकार, मा .डॉ. अनिल जी शेणवी पाटील, माD R मस्के , मा. शेणवी सर, मा. शालन पाटील मॅडम, मा.मारुती खांडेकर नाना, मा.अरुण जी खांडेकर , मा. चंद्रकांत पाटील आप्पा, व आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक व नवयुवक तसेच माता भगिनी उपस्थित होते.

प्रथम प्रास्ताविक मा. श्री. दिपक भाऊंनी केले, पाहुण्याची ओळख मा.अभय जी कुंभार यांनी केले, सर्व सुत्रसंचलन मा. अर्जुन जी कांबळे सर यांनी केले व शेवटी आभार मा. आशिष जी खांडेकर यांनी केले.

यावेळी मा.प्रा. सुवर्णसिंग जी मस्के सर (देशभक्त करिअर ॲकडमी मांगरुळ ) यांना समाज प्रबोधक, मा. तुषार जी चव्हाण यांना वृक्षमित्र, मा. योगेश शिंदे यांना समाजप्रबोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच गावातील मा. आदित्य जी मस्के मा. शुभम जी शेणवी यांना कुस्ती मध्ये मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम अविस्मरणीय साजरा केला गेला.अशी माहिती कार्यवाहक श्री आकाश आढाव नालंदा अभ्यास केंद्र मांगरुळ यांनी दिली

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट