मुलगा झाला म्हणून मित्रांना पार्टी दिल्यानंतर पाण्यात पोहायला गेलेल्या मंगेशचा बुडून दुर्दैवी मृत्यू..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :- दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास महाड तालुक्यातील भोराव येथील नदीपात्रात एका 35 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

मंगेश पांडुरंग देवे राहणार लोहारे, देऊळकोडं असे मयत तरुणाचे नाव असून सदरचा इसम महाड एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये कामाला होता.

आपल्याला मुलगा झाला याचा आनंद साजरा करण्यासाठी मंगेश याने ७ ते ८ मित्रांना पार्टी दिली होती.

काल दुपारपासून मंगेश आणि त्यांचे मित्र नांगलवाडी येथील स्मशान भूमी शेजारी पार्टी करत होते. त्यानंतर सायंकाळी मंगेश आणि त्याचे मित्र पोहायला गेले असता यामध्ये मंगेशचा बुडून मृत्यू झाला.

७ ते ८ मित्रा पैकी फक्त एकच मित्र मंगेशच्या शेजारी सापडला इतर सर्व मित्र पळून गेल्याची माहिती मिळाली.

काळ व सावित्री नद्यांचा संगम भोरावं हद्दीमध्ये होतो या ठिकाणी पाण्याची पातळी देखील मोठ्या प्रमाणात खोल असते. घटनास्थळी पोलीस प्रशासन व नडगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्य दाखल झाले.

सदरचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय काळंगिरे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट