डोंबिवली पोलीसांनी दुखापतीचया गंभीर गुन्हयातील आरोपींना शिताफीने पकडुन केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
डोंबिवली :- दिनांक २७/११/२०२३ रोजी रात्रीचे ०८.४० वा. ते ०८.४५ वा. सुमारास फिर्यादी विनोद मनोहर लकेश्री वय-५४ वर्ष, धंदा- नोकरी (वाहन चालक के.डी.एम. सी.विभाग) आरोग्य विभाग, रा.आर्या बिल्डींग, रूम.नं.२०३, धनश्री प्रथमा को.ऑप. हौ. सो. नांदिवली टेकडी, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे, यांना खोजा जमादखाना गेट च्या समोरील सार्वजनिक रोडवर, पी.पी. चेंबर च्या बाजुला, डोंबिवली पुर्व, येथे अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरून पाठीमागुन उजव्या हाताच्या दंडावर व कोपराच्या खाली चाकु सारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले, सदरबाबत अनोळखी इसमाविरूद् दिनांक २८/११/२०२३ रोजी ०१:३६ वा. गुरजि नं. ४६३/२०२३ भा.द.वि.क. ३२६ सह म.पो.का.क.३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा भर चौकात घडल्याने, गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन तात्काळ आरोपींचे शोधार्थ वेगवेगळी तपास पथके तयार करून, सदर पथकांना मार्गदर्शन करून, आरोपींचे शोधाकरीता रवाना करण्यात आले. सदर गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुचे CCTV फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे खालील ०४ आरोपी निष्पन्न करण्यात आले.

१) कमरूद्दीनन ईस्माईल शेख, वय.२५ वर्षे, रा. इंडस्ट्री समोर, अमृतनगर रोड, आर. सी.पी.मॉल जवळ, घाटकोपर प.,
२) अरबाज वहाब सय्यद, वय.२६ वर्षे, रा. सदर,
३) मो.इस्त्राईल मोहिद्दीन शहा, वय ३० वर्षे, रा. गैबनशहा दर्गा रोड, हिल नं.१, नारायण नगर, घाटकोपर,
४) शाहरूख शेख मो. फझरूद्दीन शेख, वय.२२ वर्षे, रा. रूम नं.१, निलनंद नगर, चणेवाला कंपाउंड, सकीनाबाई चाळ, घाटकोपर, मुंबई,
वरील आरोपींना ताब्यात घेवुन, त्यांना नमुद गुन्हयात दिनांक ०१/१२/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण, मा.श्री.सुनिल कुराडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, वपोनि/श्री. नितीन गिते, पोनि/आशालता खापरे (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / योगेश सानप, सपोनि/शहाजी नरळे, पोलीस उप निरी./ अजिंक्य धोंडे, पोहवा/५०३ विशाल वाघ, पोहवा/२९५ वळवडे, पोना/७०९२ कोळेकर, पो.शि/३४०६ राठोड, पो.शि/३९९८ निलेश पाटील, यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com