महाड तालुक्यातील नडगाव येथून बेपत्ता असलेला इसम १५ दिवसाने शेवटी आला घरी…?

उपसंपादक, राकेश देशमुख
महाड:- महाड तालुक्यातील नडगाव येथून दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक 45 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली होती.
इरफान सल्लाउद्दीन इसाने हा मित्राकडे महाड तालुक्यातील जुई या गावांमध्ये लग्नासाठी जात आहे असे घरातून सांगून गेला त्यानंतर अद्यापी घरामध्ये परत न आल्यामुळे घरच्या नातेवाईकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.
महाड एमआयडीसी पोलीस बेपत्ता असलेल्या इसमाचा शोध घेत होते. बेपत्ता असलेला इसम हा डोक्याने थोडा वेडसर असल्यामुळे तो गुजरात येथे निघून गेला होता असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. सदरचा इसम स्वतःहून आपल्या घरी परत आला असून पोलिसांनी बेपत्ता इसमास मिसिंग तक्रार गोल करून त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com