साताऱ्यात उंच भरारी योजना तर्फे सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायाकरिता कौशल्यपूर्ण प्रक्षिशण…

उपसंपादक -रणजित मस्के
सातारा :-सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३० या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आज रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे यांचे माध्यमातुन चारचाकी मॅकेनिक या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता १२ युवकांना अहमदनगर येथे तसेच २३ युवकांना असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता मोर जि. पुणे या ठिकाणी असे एकुण ३५ युवकांना मा. पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांनी मार्गदर्शन करुन मा.पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांचेहस्ते हिरवा झेंडा दाखवुन सर्व युवकांना पोलीस वाहनातुन अहमदनगर व मोर जि. पुणे येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.

आज अखेर उंच भरारी योजनेतुन एकुण ५४७ युवक व युवतींना समुपदेशन केले असुन सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग/ मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट इलेक्ट्रीशियन, ५ प्लंबिंग, य ६. वेल्डींग या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजअखेर एकुण ४८० प्रशिक्षणार्थीना पाठविण्यात आले आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com