विनापरवाना घातक हत्यार बाळगणाऱ्यांवर दिनांक 27/10/2023 ते 07/11/2023 पावेतो नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ची धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नाशिक:- मा.श्री. अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नाशिक, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे गुन्हेशाखा युनिट-2 कडील अधिकारी व अमलदार यांचेकडून खालील कारवाई करण्यात आली आहे.

१) दिनांक २७/१०/२०२३ रोजी पोहवा / गुलाब सोनार यांना इसम नामे प्रताप विश्वनाथ भोंड हा अवधुतवाडी पंचवटी येथे विनापरवाना घातक हत्यार बाळगुन असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले असता त्याचे कब्जात ३००/- रु किचे एक जांभीया हत्यार मिळून आले त्यामुळे त्यास पुढील कार्यवाही करीता पंचवटी पोलीस ठाणे येथे हजर केले असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२) दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोहवा / चंद्रकात गवळी यांना इसम नामे निलेश संजय गांगुर्डे वय
२१ वर्ष रा साईराम रो हा न १ दत्तनगर चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक हा त्याचे राहते घराचे परिसरात विनापरवाना घातक हत्यार बाळगुन असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करुन ताब्यात घेतले असता त्याचे कब्जात ५००/- रु किचे एक धारदार लोखंडी चॉपर मिळून आला. त्यामुळे त्यास पुढील कार्यवाही करीता अंबड पोलीस ठाणे येथे हजर केले असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३) दिनांक २९/१०/२०२३ रोजी पोहवा /८६ संपत सानप यांना नाशिक शहरातून हृददपार करण्यात
आलेला इसम नामे गणेश विष्णु कु-हाडे वय २२ वर्ष रा इंदिरागांधी वसाहत लेखानगर, सिडको, नाशिक हा इंदिरानगर परिसरात आला असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कार्यवाही करीता इंदिरानगर पोलीस ठाणे येथे हजर केलेवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

४) दिनांक ०१/११/२०२३ रोजी पोहवा / १९९ चंद्रकात गवळी यांना अंबड पोलीस ठाणे कडील गु.र.न. २४९/२०२३ भा.द.वि.क ३७९ या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे दिनेश बाळु कदम वय २२ वर्ष रा घरकुल योजना, बिल्डींग न ४ रूम न ४०१, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक हा त्याचे राहते घराचे परिसरात आला असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करीता अंबड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे..

(५) दिनांक ०१/११/२०२३ रोजी पोहवा / ५२८ राजेंद्र घुमरे यांना प्रमोद सिताराम जगताप वय ४९ विप्र रा प्लॉट न ७७, श्रमीकनगर, सातपूर, नाशिक हा चोरीचा मोबाईल विक्री करण्याकरीता महादेववाडी. सातपूर येथे येणार असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले असता त्याचे कब्जात एक आकाशी रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट मिळून आला. त्यास विश्वासात घेवून माहिती घेता त्याने सदरचा मोबाईल हॉटेल समर्थचे काउंटरवरून चोरी केला असल्याचे सांगीतले. करीता सातपूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधला असता सदर मोबाईल चोरी गेले बाबत सातपूर पोलीस ठाणे येथे गुरन ३२७/२०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदर इसमास त्याचे कब्जातील मोबाईलसह पुढील कार्यवाही करीता सातपूर पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

६) दिनांक ०२/११/२०२३ रोजी पोहवा / १९९ चंद्रकात गवळी यांना अंबड पोलीस ठाणे कडील गु.र.न. २४९/२०२३ भा.द.वि.क ३७९ या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे गोकुळ भिमराव गायकवाड वय १८ वर्ष, रा घरकुल, निलगिरीबाग, आडगाव, नाशिक हा त्याचे अंबड परिसरात आला असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करीता अंड पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

७) दिनांक ०२/११/२०२३ रोजी पोहवा / १९९ चंद्रकात गवळी यांना अंबड पोलीस ठाणे हददीतून चोरीस गेलेल्या ०३ मोटार सायकल हया इसम नामे गोकुळ भिमराव गायकवाड वय १८ वर्ष, रा घरकुल, निलगिरीबाग, आडगाव, नाशिक याने त्याचा साथीदार गुरूदेव काळु खतेले रा घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक याचेसह मिळून चोरी केल्या असुन गोकुळ गायकवाड हा निलगीरी बाग येथे आला असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने त्याचा शोध घेवून ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने १) दिपक हाईटस, खालचे चुंचाळे, अंबड २) रिसीना अपार्टमेंट, चुंचाळे शिवार, अंबड ३) शिवकृपा हाईटस, दत्त्नगर, अंबड या ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्या असल्याची कबुली देवून सदरचा मोटार सायकल हया त्याचा साथीदार गुरुदेव खतेले याने विक्री केल्या असल्याचे सांगीतले. त्याबाबत खात्री केली असता १) अंबड पो.स्टे गुरन २५१/२०२३ भादविक ३७९२) अंबड पो.स्टे गुरन ३००/२०२३ भादविक ३७९ ३) अंबड पो.स्टे गुरन १६०/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हे नोंद असल्याचे समजून आले. त्यामुळे गुरूदेव खतेले याचा शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. तरी इसम नामे गोकुळ गायकवाड यास पुढील कार्यवाही करीता अंबड पोलीस ठाणे येथे हजर केले असून त्याचा साथीदार गुरूदेव खतेले याचा शोध घेवून मोटार सायकल जस् करण्याची कार्यवाही करीत आहोत.

८) आज दिनांक ०४/११/२०२३ रोजी पोहवा / ५२८ राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्वये इसम नामे प्रसाद राजेंद्र गायकवाड वय २१ वर्ष, रा. सिंहस्थनगर सिडको, नाशिक यास संभाजी स्टेडीअम जवळ, सिडको, नाशिक येथे चोरीचे मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यास अधिक चौकशी करता त्याने सदरची मोटार सायकल त्याचे ओळखीचा नफीस रफीक सैयदरा सिंहस्थ्नगर सिडको, नाशिक याने चोरी केली असुन त्याचेकडून विकत घेतली आहे असे सांगीतले. त्यामुळे नफीस रफीक सैयद याचा शोध घेतला असता तो मुंबई नाका पो. स्टे कडील गुरन २८६/२०२३ भादवि कलम ३९२.३४ या गुन्हयात अटक असून मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड येथे न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजले असुन आरोपीचे ताब्यात मिळून आलेली १,१५,०००/- रु किची पल्सर एन १६० मोटार सायकल हि भद्रकाली पोलीस ठाणे कडील गुरन १४४/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेलेली असल्याने त्यास जम् मोटार सायकलसह पुढील कार्यवाही करीता भद्रकाली पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

९) दिनांक ०5/११/२०२३ रोजी पोहवा / 528 राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्वये मुंबई नाका पोलीस ठाणे कडील गुरन 440 / 2023 भा.द.वि.क 392.34 या गुन्हयातील चोरीचा मोबाईल हा इसम नामे फैजान कबीर शेख वय 20 वर्श, सध्या रा. गोविंद घुगे यांची चाळ, मोरवाडी, अंबड, नाषिक यास श्रीराम चौक, उत्तमनगर, सिडको नाशिक येथे चोरीचा मोबाईल विक्री करीता आला असता त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही कामी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

१०) दिनांक ०६/११/२०२३ रोजी पोहवा / 1400 शंकर काळे यांना देवळाली कॅम्प पोलीस ठाणे कडील गु.र.न. 14/२०२१ भा.द.वि.क. ३९2,34 या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे ट्रिपल एक्स उर्फ रॉकी उर्फबलराम रामचीत यादव वय 26 वर्श, रा. सरस्वती कॉलनी, वार्ड नंबर 7, श्रीरामपूर, ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर हा पाण्याची टाकी जेलरोड, नाषिकरोड परिसरात आला असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्याने त्यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले व पुढील कार्यवाही करीता देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

११) दिनांक ०७/११/२०२३ रोजी पोहवा / १४०० शंकर त्रंबक काळे यांना मिळालेल्या गोपनिय बातमी अन्वये इसम नामे दिपक विष्णू कुमावत वय २६ वर्ष, रा. पिंपळपटटी, श्रीकृष्णनगर, पंचक, जेलरोड, नाशिकरोड यास स्मशानभूमी, दसक या ठिकाणी सापळा कारवाई करून ताब्यात घेतले त्याचेकडे बारकाईने चौकशी करता त्याने सदरची मोटार सायकल हि सुमारे ३ ते ४ महिण्यापुर्वी नाशिकरोड परिसरातून चोरी केली असल्याचे कबुली दिल्याने नाशिकरोड पो स्टे ला संपर्क साधला असता सदरची मोसा चोरी गेले बाबत नाशिकरोड पो.स्टे ला गुरुन ३१२/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली असल्याने सदर आरोपी व त्याचे कब्जात मिळून आलेली २०,०००/- रू किची चोरीची मोटार सायकल असे नाशिकरोड पोलीस ठाणे येथे हजर केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट