सोलापुर येथे नाशिक शहर पोलीसांनी एम.डी. पावडर बनवण्याच्या कच्चा मालाचे गोडावूनवर केली धडक कारवाई …

उपसंपादक-रणजित मस्के
सोलापूर:-अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाची कामगिरी नाशिकरोड पोलीस ठाणे, नाशिक शहर कडील गुरनं ४२५ / २०२३ एन डी पी एस १९८५ चे ८ क, २२क, २९’ प्रमाणे दिनांक ०७/०९/२०२३ रोजी गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास चालू असुन सदर गुन्हयात दि. २७/१०/२०२३ रोजी पावेतो ८ आरोपींना अटक करण्यात आलेली होती. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सनी पगारे यांचेकडून केलेल्या तपासात नाशिक शहरात येणारी एमडी ज्या कारखान्यातुन बनवण्यात येते तो सोलापुर येथील चंद्रमोळी एमआयडीसी मोहोळ सोलापुर येथील एमडी बनविणारा कारखाना या गुन्हयाच्या तपासाकरीता स्थापन केलेला अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने चालाखीने शोध लावून सदरचा कारखाना उध्वस्थ केला होता.
अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने सदर गुन्हयात अटक आरोपीतांकडून अदयाप पावेतो एकुण ९ किलो ६९० ग्रॅम एमडी व ८ किलो ५०० ग्रॅम एम.डी सदृष्य तसेच अंमली पदार्थ निर्मिती करीता लागणारा कच्चा माल, द्रव्य रसायन व साहित्य साधणे सुमारे १,०९,११,५००/-रूपये असा एकुण किंमत रूपये १०,६३,७०,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला होता.
सदर गुन्हयात एमडी बनविण्याचे कारखान्याचा शोध लावल्यानंतर सदर कारखाना स्थापन करण्याकरीता सहाय करणारा मनोहर पांडूरंग काळे यास दि. २७/१०/२०२३ रोजी अटक केली होती. त्यानंतर सदर कारखाना स्थापन करण्याकरीता कोणी मदत केली, सदर एमडीचे कारखान्याचा मुख्य सुत्रधार कोण आहे याबाबतचा विशेष पथकाने सखोल तपास करीत असतांना ता. मोहोळ जि.सोलापुर येथे राहणारा येथे राहणारा वैजनाथ सुरेश हावळे, वय-२७ वर्ष या इसमाने सदर कारखाना स्थापन करण्याकरीता तसेच स्थानिक मदत केल्याची निष्पन्न झाले आहे. तसेच सदर कारखान्यात नमुद इसम हा पाहिजे आरोपींच्या मदतीने स्वत: ही एमडी बनवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून सदर इसमाचा शोध घेवून त्यास दि.०२/११/२०२३ रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपीस दि. ७ / ११ / २०२३
रोजी पावेतो पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
सदर आरोपीताकडे विशेष पथकाने केलेल्या सखोल तपासात ता. मोहोळ, जि. सोलापुर येथे अटक आरोपी सनी पगारे व पाहिजे आरोपी यांनी तसा एमडी बनविण्याचा कारखाना स्थापन केला होता तसाच एमडी बनविण्याकरीता लागणाऱ्या कच्चा मालाचा गोडावून गाव कोंडी, उत्तर सोलापुर येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून दि.३/११/२०२३ रोजी विशेष पथकातील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि. हेमंत नागरे, प्रविण सुर्यवंशी व पथकाने लागलीच सदर ठिकाणी जावुन छापा घातला असता त्याठिकाणी एमडी बनविण्याकरीता लागणारे मुख्य रासायनिक द्रव्याचे प्रत्येकी ५ ड्रम, अंदाजे रूपये २२ लाख किंमतीचे, तसेच १७५ किलो कुड पावडर, एक ड्रायर मशीन दोन मोठे स्पिकर बॉक्स व इतर साहित्य असे एकुन सुमारे ४० लाख किंमतीचे एमडी बनविण्याकरीता लागणारा कच्चा माल मिळून आला.
सदर तपासात असे निष्पन्न झाले की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी सनी पगारे यास गुन्हयातील पाहिजे आरोपी असलेला मुख्य सुत्रधार सोलापुर येथे एमडी बनवुन ती स्पिकर बॉक्समध्ये लपवुन स्पिकर बॉक्सव्दारे सनी पगारेकडे देत असे.
सदर गुन्हयात सनी पगारे सोबत कारखाना व गोडावून तयार करून एमडी बनविणारा सनी पगारेचे साथिदार गुन्हयातील मुख्य सुत्रधार पाहिजे आरोपी यांचा विशेष पथकाव्दारे शोध चालु आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोनि. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत नागरे, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, सपोनि. हेमंत फड व विशेष पथकातील अंमलदार सपोउनि. बेंडाळे, पोना. चंद्रकांत बागडे, पोकॉ. अनिरूध्द येवले, पोकॉ.बोरसे, पोकॉ. पानवळ, राजु राठोड व चापोअं गावीत यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com