कम्युनिटी पोलिसिंग दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून “एक हात मदतीचा” अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव चे स्तुत्य.. उपक्रम…अतीदुर्गम आदिवासी बांधवांना दिवाळी भेट..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखील पिंगळे, यांच्या संकल्पनेतून, अप्पर पोलीस अधिक्षक, गोदिया कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी, श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने कम्युनिटी पोलीसीग / दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उपक्रम राबविले जात आहेत..
भारतीय संस्कृतीत दिवाळी सण हा सर्वात मोठा आणि महत्वाचा आहे. गोरगरीब आणि श्रीमंत प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकतीनुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरीक सुध्दा आपल्या उत्पन्नानुसार आपल्या व आपल्या कुटुंबाच्या मुलभूत गरजा पूर्ण करतो. या समाजाला मूलभूत सुविधांची गरज असतानाच प्रेमाची व आपुलकीची आवश्यकता असते….या बाबीकडे लक्ष देत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी श्री. सचिन घाटे व सहकारी यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी सनानिमित्ता काहीतरी भेटवस्तु द्यावी या उद्देशाने…. १) मंगल रॉयल ज्वेलर्स प्रा. लिमी. विलेपार्ले , मुंबई

२) श्री कौशल बगाडीया मुंबई, यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करून नागरिकांना मिठाई, साहित्य, दिवाळी भेटवस्तू म्हणून देण्यात आली……


दिनांक- ०८/११/ २०२३ रोजी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव येथे परीसरातील ग्राम जांभळी, उमरपायली, डोंगरगांव व डक्कुटोला येथील आदिवासी व अतिदुर्गम बांधवांना दिवाळी भेट म्हणून दिवाळी सणा- निमीत्त जिवनावश्यक साहीत्य व मिठाई वाटप करण्यात आले.... सदर साहीत्य वाटप दिवाळी भेट कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, प्रामुख्याने उपस्थीत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सोमनाथ कदम, ठाणेदार पो.स्टे. केशोरी उपस्थित होते.....
सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, यांनी शासनाच्या विविध योजनांची माहीती उपस्थितांना देऊन गोंदिया पोलीस दल नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर असून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली.. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करतांना तुम्ही स्पर्धा.. परीक्षा पास करून तुमचा व तुमच्या कुटुंबाचा तसेच समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास करावा अशा भावना व्यक्त केल्या. सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले....
सदर कार्यक्रमाला परीसरातील १०५ नागरीकांना जिवनावश्यक वस्तु व मिठाईचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन घाटे, यांनी केले व सुत्रसंचालन केशोरी पोलीस ठाण्याचे पोहवा. सुशिल रामटेके यांनी केले, तर आभार पो.उप.नि. शुभम नवले यांनी मानलेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.फौ. राजकुमार घोरमारे, पो.हवा. शामराव मडावी, सतिश भोवते, राजेश पुराम, देवेंद्र थेर, गणेश मिसार पोलीस नाईक कमलेश राऊत, किशोर नखाते, अरविंद वालदे, पो.शि. प्रकाश गभने, नोहरलाल लिल्हारे, रत्नशिल मेश्राम, नागेश देवकर यांनी परिश्रम घेतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com