कोरेगांवात अट्टल दुचाकी मोटर सायकल चोरटयाला अटक करून त्यांचे कडुन 3,20,000/- रूपये किमंतीच्या चोरीच्या ११ मोटरसायकली जप्त कोरेगांव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:- कोरेगांव पोलीस ठाणे मध्ये मा. श्री समीर शेख सो, पोलीस अधीक्षक सातारा, मा. आँचल दलाल सो, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी वाढत्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामुळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरट्याचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मा. श्री. राजेंन्द्र शेळके सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव विभाग, कोरेगांव व मा. श्री. सखाराम बिराजदार सो सहाय्यक पोलीस निरीक्षक, कोरेगांव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगांव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके, गणेश भोंग, अनिकेत जाधव, प्रमोद जाधव, प्रविण माने यांचे पथकाने कोरेगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरास पकडण्याचे शोध कार्य सुरु केले असता खास बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की, सातारारोड ता. कोरेगाव जि.सातारा गावचे हद्दीत एस टी स्टैण्ड परिसरात येथे दोन इसम चोरीची मोटरसायकल विक्री साठी येणार आहे अशी गोपनीय माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी सातारारोड गावचे हद्दीत एस टी स्टॅण्ड परीसरात सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1 ) निखिल सुरेश सपकाळ वय 23 वर्षे 2) सुशांत शंकर पवार वय 25 वर्षे दोघे रा. निगडी ता. कराड जि.सातारा असे सांगितले त्याच्या ताब्यातील दुचाकीची चौकशी केली असता सदरची दुचाकी मोटरसायकलची हि कोरेगांव पोलीस ठाणे गु.र.नं 465/2023 भादविस कलम 379 मधील दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना पोलीस ठाणेत आणुन विश्वासात घेवुन अधिक चौकशी केली असता त्यांनी सातारा, सांगली, पुणे जिल्हा हद्दीतुन व इतर ठिकाणाहुन एकुण अकरा दुचाकी मोटर सायकल चोरी केली असल्याची कबुली दिली असुन 1) निखिल सुरेश सपकाळ वय 23 वर्षे 2) सुशांत शंकर पवार वय 25 वर्षे दोघे रा. निगडी ता. कराड जि.सातारा त्याचे कडुन निवेदन पंचनाम्याने अकरा दुचाकी असे एकुण 3,20,000/- रु. कि चा मद्देमाल हस्तगत करुन आरोपी यांस मा. कोर्टात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.

मा. श्री राजेन्द्र केसी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगांव विभाग, कोरेगांव व मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार सो, कोरेगांव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली कोरेगांव पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश माने, राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके, गणेश भोंग, प्रमोद जाधव, अनिकेत जाधव, प्रविण माने यांनी सहभाग घेतला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट