विट्यात साखळी चोरणाऱ्या दोघांना अटक निर्भया पथकाची कामगिरी : पोलिसांनी पाठलाग करून पकडले

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली – विटा :- विट्याच्या निर्भया पथकाने केलेल्या कामगिरीत कडेगाव तालुक्यातील कोतिज गावातील दोन साखळी चोर जेरबंद झाले. भास्कर सुखदेव सावंत आणि सुधाकर अशोक मोहिते अशी त्यांची नावे आहेत. याबाबत इंदू कैलास सुतार (वय ५५) रा. झरे, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

इंदू सुतार या पतीसह झरे येथे राहतात. बुधवारी दुपारी इंदू या झरे गावातून खरसुंडी रस्त्याकडे चालत जात असताना एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून दुचाकी आली. त्यावर बसलेल्यांनी चालत्या गाडीवरून इंदू यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे गंठण हिसडा मारून पळवून नेले.

विटा पोलिस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखालील निर्भया पथक बुधवारी विटा ते वेजेगाव आणि

खरसुंडी मार्गावर गस्त घालत असताना एका काळ्या गाडीवरून दोन व्यक्तींनी एका महिलेचे सोन्याचे गंठण हिसडा मारून मायणीच्या दिशेने जोरात पलायन केले आहे, अशी टीप मिळाली. या पथकाने पाठलाग करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ते दुचाकीवरून पळून गेले. त्यानंतर पुन्हा पाठलाग करून थांबविले आणि त्यांच्याकडे विचारणा केली असता, दोघे कडेगाव तालुक्यातील कोतीज या गावचे असून त्यांची नावे भास्कर सावंत आणि सुधाकर मोहिते असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची झडती घेतली असता सुधाकर मोहितेच्या पँटच्या खिशात एक सोन्याचे गंठण मिळून आले. याबाबत त्याला विचारले असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ते गंठण चोरल्याचे कबूल केले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट