साताऱ्यात हायवेवरील वाहन चालकांना जुगार खेळवून त्यांची फसवणुक करणाऱ्या टोळीस भुईंज पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :- हायवे रोडने जाणा-या वाहन चालकांना मध्यरात्री तीनपानी काला पीला नावाचा जुगार खेळवून त्यांची फसवणूक करणा-या टोळीला भुईज पोलीसांकडुन अटक, ७ जणांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन ४ लाख १९ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांनी जिल्हयातील अवैध धंदयाविरुद्ध प्रभावी कारवाया करून त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाणे मार्फत अवैध धंदयाविरुध्द कारवाईची मोहिम गुरु आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी रमेश गजे सपोनि भुईज पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आनेवाडी तालुका- जावली गावचे हददीत टोल नाक्याच्या पुढील बाजुस आनेवाडी पुलाचेजयक्त, हायवे रोडचे कडेला मध्यरात्रीच्या सुमारास काही इसम हायवे रोडने जागा या वाहन चालकांना तीनपानी काला पीला नावाचा जुगार खेळवून त्यांची फसवणूक करीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीचे अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच दोन पंचांना बोलावून त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देवून त्यांचेसह २ नोहेंबर २०१३ रोजी मध्यरात्री ०१.१५ वा.पा टाकला असता सदर ठिकाणी काही सहाय कडेला टेबल लावून चॅटरीच्या उजेडात हायवेने जाणा-या वाहन चालकांना थांबवून त्यांना तीनपानी काला पीला नावाचा जुगार खेळताना दिसले, तेथे हजर असणा-या एकुण ७ इसमांना रेड पार्टीतील अधिकारी व अमलदार यांनी ताब्यात घेवून त्यांचे तापातून १० हजार रुपये रोख रक्कम, १ पांढरे रंगाची मारुती ८०० कार, १ अॅक्टीव्हा मोटारसायकल, ८ मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहीत्य असा एकूण ४ लाख १९ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली मुईज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईज कडील पोलीस उप- निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार राजाराम माने, रविराज पर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, किरण नाकर, राजेश कांबळे, सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून सहभागी अधिकारी व अमलदार यांच पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाई यांनी अभिनंदन केले आहे..
यापुढे देखील भुईंज पोलीस स्टेशन मार्फत अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणेसाठी प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.
आरोपींची नावे :
१. अक्षय सयाजी सोनावणे, वय-२९ वर्षे, रा. विरमाडे, ता. वाई
२. हरीश्चंद्र मखनलाल पटेल, वय-३३ वर्षे, रा. करंजेपेठ, ता. जि. सातारा, मुळ रा. कुलारवर, जिल्हा
फतेप्पुर, राज्य – उत्तरप्रदेश.
३. रविकुमार रामरतन सिंग, वय-३७ वर्षे, रा. मरीनड्राईव्ह, मुंबई मुळ रा. टाटानगर, जमशेदपुर, झारखंड.
४. विजय सखाराम यादव, वय – ४२ वर्षे, रा. गोळीबार मैदान, सातारा, मुळ रा. कोंढवेता. जि. सातारा
५. राजु भगवानदेढे, वय-५५ वर्षे, रा. महात्माफुलेवाडी, वडाळा मुंबई
६. बाळु भगवान राजगुरु, वय-५५ वर्षे, रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com