कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजने अंतर्गत सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-

🪷 मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कैंप देवरी, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी, यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे कम्युनिटी पोलीसींग दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित करून राबविण्यात येत आहेत.
🔹या अनुषंगाने दि.३१/१०/२०२३ रोजी जि.प. प्राथमिक शाळा गंधारी येथील इयत्ता १ ली ते ४ थी च्या एकूण ४८ विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल व टिफीन बॉक्स वाटप करण्यात आले. सदर अतिदुर्गम व संवेदनशील जि.प. शाळेत परीसरातील मोलमजुरी करणा-या गरीब आदिवासी कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहीत्य देण्यास पालक हतबल ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगांव ने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
🔸सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव सपोनि. सचिन घाटे, हे होते. यावेळी अध्यक्षीय भाषणातून त्यांनी रोटरी क्लब नागपुर साऊथ ईस्ट व जिवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांच्याकडुन विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहीत्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
🔹सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून बोडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. दिलीपजी तिरपुडे, जि.प.शाळा गंधारीचे मुख्याध्यापक श्री. कापगते सर, गंधारी अंगणवाडी शिक्षीका श्रीमती करंजेकर मॅडम व श्रीमती शहारे मॅडम हजर होते.
🔸सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जि.प.शाळेचे सहशिक्षक डाखोळे सर यांनी केले तर, आभार पो.उप.नि. शुभम नवले यांनी मानलेत..
🔹सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पो.हवा. सतिश भोवते, देवेंद्र थेर, गणेश मिसार पोलीस नाईक कमलेश राऊत, किशोर नखाते, अरविंद वालदे पो.शि. प्रकाश गभने, नोहरलाल लिल्हारे, रत्नशिल मेश्राम, नागेश देवकर यांनी परिश्रम घेतले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com