पोलीस मुख्यालय गोंदिया येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उत्कृष्ट आयोजन संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-

⏩. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीयांचे शरीर निरोगी राहावे या संकल्पनेतुन पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दल व आर्थो एन्ड ट्रामा सर्जन डॉ. गुरप्रीत सिंह कामठा, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ व त्यांचे कुटुंबीयाकरिता दिनांक ३१ / १० / २०२३ रोजी पोलीस मुख्यालय गोंदिया येथे मोफत आरोग्य तपासणी व त्या संबंधाने बेसिक मेडीनशन वाटप संबंधाने शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबीरात डॉ. गुरप्रीत सिंह व त्यांची चमु शालुम शिवणकर, दिपीका परसमोडे यांच्या गोंदिया जिल्हा पोलीस विभागातील पोलीस अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.


 🔸 सदर शिबीरात पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) गोंदिया श्रीमती नंदिनी चानपुरकर यांनी संबोधित करुन शरिर निरोगी बनविण्यासाठी आपल्या शरीरास कुठ कुठले दुष्परिणाम होतात, ते टाळण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे त्याकरिता डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार पोलीस अधिकारी / अंमलदारांनी त्या गोष्टीचा पालन करणे आवश्यक आहे. दरवर्षी आरोग्याची तपासणी करुन स्वतःचे आत्म निरीक्षण करणे आवश्यक आहे. आणि ते वेळीच तपासणी केली तर ते आपण चांगल्या पध्दतीने सुध्दा करु शकतो असे उपस्थित पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले व आलेले शिबीरात डॉक्टरांचे आभार मानले.

   🔹.तद्नंतर सदर शिबीरात उपस्थित डॉक्टरांकडुन जवळपास एकुण १३५ च्या संख्येने पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली.

   🔸 त्याचप्रमाणे सदर शिबीरात रक्त तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी व शरीररातील समस्या असलेल्या हाडा संबंधी तपासणी अशा प्रकारच्या मोफत तपासणी करण्यात करण्यात आलेली असुन व त्या संबंधाने बेसिक मेडीटेशन वाटप करण्यात आलले असुन मोठया संख्येने पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांनी सदर शिबीराचा लाभ घेतला.

  🔸 सदर शिबीरात पोनि नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे, पोनि योगिता चाफले तसेच पोलीस अधिकारी / अंमलदार व त्यांचे कुटुंबीय हे मोठया संख्येने उपस्थित होते. ..

    🔹 सदर शिबीराचे सुत्र संचालन पोहवा राज वैद्य, यांनी केले. तर सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्याकरिता प्रभारी पोलीस उप अधीक्षक (गृह) पो.नि. नंदिनी चानपुरकर, रापोनि रमेश चाकाटे, सफौ रोशन उईके, पोहवा पंकज पांडे, मपोहवा मंगला प्रधान, पोहवा राजेश पटले, राज वैद्य, मपोकॉ दर्शना राणे, पोकॉ राशिद शेख तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील स्टाफ यांनी सहकार्य केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट