म्हसळे तालुका बौध्दजन‌ समिती मुंबई यांच्या विद्यमाने कोरोनात मृत झालेल्यांना अनोखी श्रध्दांजली!

0
Spread the love

प्रतिनिधी :- अभिजित माने

भाईंदर (पुर्व) : दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी प्रशस्त म्युनिसिपल सभागृह भाईंदर पुर्व येथे म्हसळे तालुका बौद्धजन समिती मुंबई, बौध्दजन पंचायत समिती ३६ गाव तालुका शाखा म्हसळे, संघमित्रा महिला आघाडी, म्हसळे तालुका बौध्दजन‌ युवा आघाडी मुंबई आणि स्थानिक सम्राट युवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने‌ रविवारी भाईंदर (पुर्व) येथील प्रशस्त म्युनिसिपल सभागृह या ठीकाणी वर्ष-२०२० आणि २०२१ या कोरोना काळात निधन पावलेल्या म्हसळे तालुका बौद्धजन समिती मुंबई या संस्थेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील धम्म बांधव‌ यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

समितीतर्फे कॅलेंडर वाटप

महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन आणि दिप प्रज्वलीत करून पंचशील त्रिसरणाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

श्रध्दांजली सभेचा कार्यक्रम संपन्न झाल्या नंतर म्हसळे तालुका बौध्दजन‌ समिती मुंबई या संस्थेच्या वतीने सन २०२२ या नूतन वर्षाच्या प्रथम दिनदर्शिकेचे प्रकाशन मानवरांच्या हस्ते आणि समितीच्या सर्व पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार लाभलेले गुरुवर्य स. भि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमाला डॉ. संजय खैरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता म्हसळे तालुका बौध्दजन‌ समितीच्या सर्व पदाधिका-यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. मुकुंद पवार यांनी केले तर सुत्रसंचालन आयु. सुभाष जाधव यांनी केले. सरणेतेयं घेऊन भोजनदान झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट