“कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांचे करीता रनिंग ट्रॅक चे निर्माण.. स्तुत्य उपक्रम..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :




मा. पोलिस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे (IPS) "यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली "कम्युनिटी पोलिसिंग" च्या माध्यमातून मा "अप्पर पोलिस अधीक्षक" मा.अशोक बनकर. कॅम्प देवरी,
“उपविभागीय पोलिस अधिकारी मा. संकेत देवळेकर, यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, तसेच पोनि. बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे नेतृ्त्वाखाली सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया चे प्रभारी अधिकारी PSI एकनाथ डक व सहकारी PSI संतोष माळगे व अंमलदार यांचे मदतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस दूरक्षेत्र पिपरीया येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यात येत आहे सदर प्रशिक्षणासाठी दुरुक्षेत्र हद्दीतील जवळपास 50 ते 60 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत परंतु प्रशिक्षणार्थींना रनिंग करण्यासाठी व्यवस्थित ट्रॅक नव्हता आम्ही एओपी चे अधिकारी व अमलदार आणि प्रशिक्षणार्थी असे मिळून रनिंग साठी ट्रॅक बनवण्याचे ठरवून ट्रॅक्टर, रोलर , विद्यार्थ्यांनी व आम्ही मेहनत घेऊन उत्तम असा रनिंग चा ट्रॅक बनवला व त्याचे उद्घाटन आज दिनांक 28/10/ 2023 मा. श्री संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे शुभहस्ते करण्यात आले.

🔸. सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी मा. संकेत देवळेकर, पोनि. श्री. बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि युवक हजर होते.सदरचा उपक्रम हा शांततेत पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com